Ponniyin Selvan 2 Dainik Gomantak
Image Story

Ponniyin Selvan 2: या 5 कारणांसाठी बिग स्क्रिनवर पोन्नियन सेल्वन पाहाच...

28 एप्रिलला रिलीज होणारा पोन्नियन सेल्वन प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

Rahul sadolikar

Ponniyin Selvan 2: गेल्या काही दिवसांपासुन केवळ साऊथमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात मनोरंजन विश्वातल्या एका भन्नाट कलाकृतीची चर्चा सुरूय.. 'PS 1' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर, ​​​​'Ponniyin Selvan 2' 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

मणी रत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन 2 च्या भव्य- दिव्य निर्मितीने प्रेक्षकांचे डोळे दिपणार हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही.

ऐतिहासिक कथेची मांडणी करणारा हा चित्रपट थिएटरमध्येच का पाहावा? त्याचं कारण चला पाहुया. ही 5 कारणं तुम्हाला पोन्नियन सेल्वन पाहण्यासाठी थिएटरकडे वळण्यास नक्कीच प्रवृत्त करेल.

Ponniyin Selvan 2

1. आदित्य करिकालनचा शेवट

चियान विक्रम, जो 'पोनियिन सेल्वन' च्या पहिल्या भागात आदित्य करिकलनच्या भूमिकेत खूप चिडलेला दिसला होता, तो त्याचा भाऊ अरुण मोझिवर्मन (जयम रवी) यांच्या निधनाची बातमी ऐकून चोलस राजधानीत परतणार आहे. 

दरम्यान, पांड्य आपल्या राजाला मारल्याबद्दल आदित्य करिकालनचा बदला घेण्यासाठी थांबतात. पण आदित्य करिकलनची हत्या कशी होणार आणि त्याचे शीर कोण कापणार? याकडे लक्ष वेधले जाणार आहे.

Chian Vikaram

2. ऐश्वर्या रायचा दुहेरी अभिनय

या ऐतिहासिक चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन मंदाकिनी आणि नंदिनी अशी दुहेरी भूमिका साकारत आहे. पण तिची नंदिनी ही व्यक्तिरेखा प्रामुख्याने चित्रपटाच्या भागावर केंद्रित आहे. 

ऐश्वर्या राय 'PS 2' मध्ये मंदाकिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची रहस्यं 'PS 2' मध्ये उघड होणार आहे. पण तिची दोन्ही पात्रे एकत्र येतात की नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. आणि म्हणुनच PS 2 ची कथा चाहत्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण असेल.

Aishwarya Rai

3. जयम रवी पुन्हा परतणार

जयम रवी, ज्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते, तो अफवा खोट्या ठरवुन जिवंत होणार आहे आणि त्याचे पुनरागमन हे निश्चितपणे चित्रपटातील एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे.

 तसेच, जयम रवी त्याचा मोठा भाऊ आदित्य करिकलन यांच्या निधनानंतर चोलचा राजा म्हणून शपथ घेणार आहे आणि तो आपल्या भावाचा पराभव कसा स्वीकारतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Jayam Ravi

4. मणिरत्नमची यांचा भन्नाट स्क्रिनप्ले

मनीरत्नम हे कथेच्या मांडणीवर जबरदस्त पकड असणारे लेखक- दिग्दर्शक आहेत. पोन्नियन सेल्वन ही जरी एक कादंबरी असली तरी मणिरत्नम यांच्या पटकथा लेखनाच्या कमालीच्या कौशल्याने चित्रपटाला चार चांद लावले असे नक्कीच म्हणता येईल.

 सिक्वेलमध्येही त्यांच्या रंजक पटकथेने प्रेक्षक भारावून जातील.. मणिरत्नम यांनी 'PS 2' हा 'PS 1' पेक्षा छोटा आणि क्रिस्पर बनवला आहे. दुसरा भाग अजुन काय रंजक गोष्ट सांगणार आहे यासाठी प्रेक्षकांना थिएटर्समध्ये जावं लागेल.

Mani Ratnam

5. ए. आर रहमानचं स्वर्गीय संगीत

पोन्नियन सेल्वन पाहण्याचं अजुन एक अफलातून कारण म्हणजे या चित्रपटासाठी ए.आर. रहमान संगीत देत आहेत, या महान संगीतकाराने 'पोनियिन सेल्वन'च्या पहिल्या भागासाठी आपल्या संगीताची जादू दाखवून दिली आहेच.

 'पोनियिन सेल्वन 2' मध्ये पहिल्या भागापेक्षा जास्त गाणी आहेत आणि ए.आर रहमान यांनी चित्रपटाला अधिक ताकद देण्यासाठी अनेक थीम ट्रॅक देखील रेकॉर्ड केले आहेत. त्यामुळे ए.आर.रहमानचे संगीत ऐतिहासिक नाटकाला एका दमदार कलाकृतीत रूपांतरित करेल यात शंका नाही.

A.R. Rahman

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT