दैनंदिन आहारात बीन्सचा समावेश आरोग्यदायी Dainik Gomantak
चण्यामध्ये प्रथिने, फायबर आणि फोलेट भरपूर प्रमणात असते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचे सेवन केल्यास
कोलेस्ट्रॉल देखील कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
मुगाची डाळ पचण्यास हलकी असते. यामुळे पचनसंस्था सुरळीत कार्य करते. फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
यात लोह देखील असते. राजमामध्ये फायबर भरपूर असतात. राजमा खाणे आरोग्यसाठी लाभदायी असते. कारण रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत करते. वाटाणा फायबर आणि प्रथिने भरपूर असतात. यात असलेले फायबर आतड्यातील निरोगी बॅक्टेरिया पुन्हा भरून काढते आणि आरोग्य निरोगी ठेवते.