युद्ध: जगात सध्या भीतीचे वातावरण आहे. एकीकडे इस्त्रायल आणि हमास युद्धाने तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन युद्धाने चिंता वाढवली आहे.
इस्त्रायल: जगाच्या पाठीवर सातत्यानं चर्चेत असणाऱ्या देशांमध्ये येणारं एक नाव म्हणजे इस्रायल.
कुतूहल: जगभरात इस्रायलच्या सैन्याविषयी कमालीचं कुतूहल असून, या देशातील ज्यू समुदाय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्यांच्या योगदानासाठी ओळखला जातो.
हळवी बाजू: इस्त्रायलमधील प्रत्येक व्यक्ती इथं असणाऱ्या एका भींतीपाशी येऊन रडतात. असं का घडतं, या रहस्यमयी भींतीमागे दडलंय काय? हा प्रश्न अनेकांनाच पडतो.
वेलिंग वॉल: फक्त इस्रायल नव्हे, तर संपूर्ण जगातील ज्यू इथं असणाऱ्या वेस्टर्न वॉलपाशी येतात कारण हे त्यांच्यासाठी एखाद्या तीर्थक्षेत्रासमान आहे. 'वेलिंग वॉल' किंवा 'कोटेल' म्हणूनही या भींतीला ओळखलं जातं.
रडू कोसळतं: या वेलिंग वॉलपाशी येताच ज्यूंच्या डोळ्यांतून आसवं घरंगळतात आणि ते हमसून हमसून रडू लागतात.
पवित्र तीर्थक्षेत्र: पहिलं शतक सुरु होण्यापूर्वी पॅलेस्टाईनवर रोमन साम्राज्याची सत्ता आली आणि त्याच काळात ज्यूंचं पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या सेकंड टेंपलला उध्वस्त करण्यात आलं.
परमात्म्याशी संवाद: अशीही धारणा आहे की, ही भींत ज्यूंना थेट परमात्म्याशी संवाद साधण्याची संधी देते.
धार्मिक आणि राष्ट्रीय कार्यक्रम: अनेक धार्मिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमही या ठिकाणी पार पडतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.