Goa Tourist Places Dainik Gomantak
Image Story

Goa Tourist Places: फॅमिली ट्रिपसाठी गोव्यातील 5 सर्वोत्तम ठिकाणं, आताच करा ट्रिप प्लॅन

Goa Tour: गोवा फक्त पार्टी डेस्टिनेशन नसून कुटुंबासोबत फिरण्यासाठीही एक उत्तम पर्याय आहे. येथे सुंदर समुद्रकिनारे, निसर्गरम्य स्थळे आणि ऐतिहासिक वारसा अनुभवता येतो.

Sameer Amunekar
Goa Tourist Places

पाळोले बीच

पाळोले बीच हा गोव्यातील सर्वात सुंदर आणि शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. दक्षिण गोव्यातील हा किनारा स्वच्छ आणि कमी गर्दीचा असल्याने फॅमिली ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे. येथे डॉल्फिन स्पॉटिंगसाठी खास बोट टूर उपलब्ध आहेत. शांत समुद्रात कयाकिंगचा रोमांचक अनुभवही येथे घेता येतो.

Goa Tourist Places

आग्वाद किल्ला

आग्वाद किल्ला हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. पोर्तुगीजांनी 1612 साली बांधलेला हा किल्ला समुद्राच्या किनाऱ्यावर उभारला. किल्ल्यावरून अरबी समुद्राचे मनमोहक दृश्य पाहता येते.

Goa Tourist Places

बोंडला अभयारण्य

बोंडला वन्यजीव अभयारण्य हे गोव्यातील सर्वात छोटे, पण अत्यंत निसर्गरम्य अभयारण्य आहे. हे अभयारण्य उत्तर गोव्यात, फोंडा तालुक्यातील पश्चिम घाटाच्या परिसरात वसलेले आहे आणि निसर्गप्रेमी, वन्यजीव निरीक्षक आणि कुटुंबांसाठी उत्तम पर्यटनस्थळ आहे.

Goa Tourist Places

शापोरा किल्ला

गोव्यातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक म्हणजे शापोरा किल्ला. हा किल्ला फक्त त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठीच प्रसिद्ध नाही, तर अथांग अरबी समुद्राच्या आणि वागातोर बीचच्या विहंगम दृश्यांसाठीही ओळखला जातो.

Goa Tourist Places

अभयारण्य

गोव्यातील सलीम अली पक्षी अभयारण्य हे पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण आहे. हे अभयारण्य मांडवी नदीच्या किनारी वसलेले असून, भारतातील प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. साळीम अली यांच्या नावानं ओळखले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

One-year of Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ला 1 वर्ष पूर्ण: पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी बदलला सोशल मीडिया डीपी!

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT