International Friendship Day Dainik Gomantak
Image Story

Friendship म्हणजे इम्युनिटी बूस्टर, जाणून घ्या मैत्रीची 4 आरोग्यदायी कारणे

Priyanka Deshmukh
International Friendship Day

International Friendship Day 2022: जग तुमच्या लॅपटॉप, मोबाईल आणि iPad च्या एका क्लिकवर आले आहे. मात्र आभासी दुनियेतील मैत्री, आवडी-निवडी आणि मनोरंजनाने आयुष्यात खरा आनंद मिळू शकत नाही. कारण खऱ्या जगातली लोकं मैत्री आणि प्रेमासाठी आसुसलेले आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही मैत्री खूप महत्वाची आहे. होय, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की जीवनात तुमचे मित्रांसोबत बोलणे, समस्या शेअर करणे आणि गॉसिपिंग करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते.

International Friendship Day

फ्रेंडशिप डे जवळ आला आहे आणि तुमच्या मित्रांसोबतचे तुमचे बंध पुन्हा मजबूत करण्याची ही एक उत्तम संधी आहे. कोरोना काळात आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली होती आणि ती अजूनही संपलेली नाही. अशा परिस्थितीत, आपले खरे मित्र आणि प्रियजनांशी जोडलेले राहणे अधिक महत्त्वाचे असते. एक चांगला मित्र तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी कसा मदत करतो ते जाणून घ्या.

International Friendship Day

इम्युनिटी बूस्टर

मैत्री ही पौष्टिक आहार, व्यायाम आणि पूरक आहार व्यतिरिक्त एक वेगळी भावनिक गोष्ट आहे. म्हणून प्रत्यक्षात, प्रतिकारशक्ती वाढवणारे मित्र अनेक गोष्टींशी संबंधित आहेत. मैत्री केवळ भावनिक बाजूच नाही तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवण्यातही हातभार लावते. मित्रांसोबत असल्याच्या भावनेनेही धीर खूप वाढतो. तुमच्या मनातील गोंधळ दूर करून सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी मित्र तुम्हाला प्रेरणा देतो. तुम्ही आजारी असताना किंवा अडचणीत असताना मित्र सतत लढायला प्रवृत्त करतो आणि कधी कधी तुमचा जोडीदार बनून तुमच्यासोबत व्यायाम करतो. म्हणूनच मित्र हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा एक प्रोटिन असतो, जो तुमच्या आरोग्यासाठीही चांगला असतो. विज्ञान असेही मानते की चांगली मैत्री किंवा समर्थन आरोग्यासाठी बूस्टर म्हणून काम करतात.

International Friendship Day

भावनिक आधार

तुम्ही एखादी गोष्ट कुटूंबियांशी शेअर करू शकत नसाल तर ती हक्काने मित्रासोबत शेअर करता. कारण मित्र तुमचे ऐकून घेतो आणि समजून घेवून तुम्हाला उपायही सांगतात. कठीण काळात मित्रांसोबत राहिल्याने बळ मिळते. ते तुमचा तणाव दूर करण्यात मदत करतात, तुम्हाला तणावातून बाहेर काढतात. त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला होतो. यामुळेच मित्रांच्या सहवासात तुम्हाला आनंद वाटतो.

International Friendship Day

हॅपी हार्मोन्स

तुम्ही तुमचा बहुतेक वेळ मित्रांसोबत, मजा, मस्करी करण्यात घालवता. यामुळे आनंदाचे विविध हार्मोन्स आपल्या शरिरात तयार होतात.जेव्हा तुम्ही मित्रांसोबत बाहेर असाल तेव्हा डोपामाइन, सेराटोनिन सारखे आनंद हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स आनंद देतात, तसेच तणाव आणि चिंता यासारख्या परिस्थितींपासून दूर राहण्यास किंवा बाहेर पडण्यास मदत करतात.

International Friendship Day

मित्रांसोबत व्यायाम करण्याचे फायदे

नुकतेच विद्यार्थ्यांवर केलेल्या एका संशोधन अभ्यासातून असे समोर आले आहे की, एका गटात व्यायाम केल्याने आरोग्य, मानसिक, शारीरिक आणि भावनिक या तिन्ही स्तरांवर चांगला परिणाम होतो. विशेषतः जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत ग्रुपमध्ये व्यायाम करत असाल तर सकारात्मक उर्जा मिळते. या संशोधनात असेही आढळून आले की, समूहातील व्यायाम करणाऱ्यांमध्ये फील-गुड हार्मोन्स म्हणजेच एंडोर्फिन सोडण्याची पातळीही वाढते आणि दु:ख सहन करण्याची क्षमताही वाढते. मित्रांसोबत व्यायाम करून तुम्हाला दुहेरी फायदे मिळू शकतात.

International Friendship Day

समजूतदार मैत्री

येथे हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तुमची मैत्री कशी आहे किंवा तुम्ही मित्र म्हणून निवडलेली व्यक्ती कशी आहे? जर एखादा चांगला आणि समजूतदार मित्र तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतो, तर एक स्वार्थी आणि धूर्त व्यक्ती तुमच्या मैत्रीचा चुकीचा फायदा घेऊन तुम्हाला शारीरिक आणि मानसिक वेदना देऊ शकतो. त्यामुळे मैत्री करताना थोडी काळजी घ्या. कारण हे मित्र जबरदस्तीने सिगारेट किंवा दारू पिण्यास प्रवृत्त करतात. तर काही मित्र तुम्हाला वाईट व्यसन सोडण्यास मदत करतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे मित्र निवडता हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT