Friendship Day Dainik Gomantak
Image Story

Friendship Day निमित्त मित्रांसोबत बघा हे खास चित्रपट, जुन्या आठवणी होणार ताज्या

Friendship Day: आज वीकेंड आहे त्यामुळे तुम्ही मित्रांसह बॉलीवूडची खास मैत्रीवर आधारीत चित्रपट पाहू शकता.

दैनिक गोमन्तक
Friendship Day

आपले जवळचे मित्र अजूनही शेकडो मैल दूर आहेत या वास्तवाची भरपाई करण्यासाठी आपल्या सर्वांना चांगली आणि जीवन बदलवणारी मैत्री हवी असते. जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते. देश आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करत आहे आणि आज वीकेंड आहे त्यामुळे तुम्ही मित्रांसह बॉलीवूडची खास मैत्रीवर आधारीत चित्रपट पाहू शकता.

Friendship Day

जिंदगी ना मिलेगी दोबारा

अभय देओलच्या कल्कीशी लग्नापूर्वीच्या बॅचलर पार्टीचा एक भाग म्हणून, तीन मित्रांचा एक गट (हृतिक, अभय देओल आणि फरहान अख्तर) संपूर्ण स्पेनमध्ये रोड ट्रिपला निघतात. हृतिक आणि फरहान दोघेही वैयक्तिक समस्यांना तोंड देत असतात. या चित्रपटात दीप्ती नवल आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही नात्याची केमेस्ट्री बघायला मिळते. चित्रपटात लग्न आणि प्रेम हे प्रमुख विषय आहेत. तरीही, चित्रपटातील अप्रतिम कॉमेडी नेहमीच तुमचे मनोरंजन करत राहते. म्हणून मैत्रीच्या या दिवशी तुम्ही हा चित्रपट नक्की बघायला पाहिजे.

Friendship Day

3 इडियट्स

राजकुमार हिरानी यांनी नेहमीच विशिष्ट विषय हाताळले आहेत. समाजाच्या अनेक दुर्बल समजुती आणि नीतिमत्तेचा त्यांनी नेगमीच उपहास केला आहे. जर तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही वैद्यकीय विज्ञान किंवा अभियांत्रिकी यापैकी एका क्षेत्रात गेले पाहिजे. हा विचार या चित्रपटाने पुसून टाकला आहे. रँचो, राजू आणि फरहानचा प्रवास वेदनादायक आणि मनोरंजक आहे. त्यांच्या नात्यातला साधेपणा आपल्या हृदयाला भिडतो. हा चित्रपट महाविद्यालयीन सोबत्यांची आणि त्या एका विचित्र मित्राची आठवण करून देतात ज्याने नेहमी चौकटीबाहेर विचार करण्याचे धाडस केले.

Friendship Day

छिछोरे

छिछोरे हा एक भावनिक रोलर कोस्टर आहे जो महाविद्यालयीन काळातील मैत्री, प्रेम, रॅगिंग, वाद, स्पर्धा आणि असंख्य आठवणींचा आदर करतो. या चित्रपटातून एक आवश्यक संदेश देण्यात आला आहे. 'दंगल' फेम नितेश तिवारी दिग्दर्शित 'छिछोरे'विद्यार्थ्यांना परिस्थितीचा सामना करायला अपयश पचवायला शिकवणारा चित्रपट आहे.

Friendship Day

फुक्रे

हा चित्रपट तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या दिवसात घेऊन जाईल. ही चार आळशी लोकांची कथा आहे ज्यांना लवकर श्रीमंत व्हायचे आहे आणि त्यांच्या शालेय दिवसांचा आनंद घ्यायचा आहे. महाविद्यालयीन मुली आणि प्रॉम नाईटपासून ते सर्व काही गोंधळात टाकणाऱ्या या मुलांपर्यंतचा प्रवास खूप मनोरंजक आणि कॉमेडी आहे.

Friendship Day

दिल चाहता है

तरुणांना व्यवसायात आणणे ही नेहमीच सकारात्मक गोष्ट कशी असते हे यात दाखवण्यात आले आहे. 'दिल चाहता है' हा एक प्रसिद्ध चित्रपट आहे. जोआजही लोकांना बघायला आवडतो. कठीण परिस्थितीत मैत्री एकमेकांना किती गरजेची असते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

Friendship Day

ये जवानी है दिवानी

कॅमेरा वर्कपासून संगीतापर्यंत रंगीत लेखन आणि कलाकारांपर्यंत, हा चित्रपट म्हणजे मैत्रीचा एक सुंदर उत्सव आहे. हा आतापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध बॉलीवूड मैत्री चित्रपटापैकी एक आहे. यात चार मित्रांच्या जगण्याच्या पद्धती, सेटल होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्याचबरोबर मैत्रीतली ओढ दाखवण्यात आली आहे.

मुन्ना भाई एमबीबीएस

मुन्नाभाई एमबीबीएस हा एका गँगस्टरचा विनोदी चित्रपट आहे. या गँगस्टरला डॉक्टर व्हायचे असते. चित्रपटात कॉमिक आणि गंभीर दोन्ही प्रसंग दाखवण्यात आले आहेत. मुन्नाभाई आणि सर्किट सारख्या सुप्रसिद्ध जोडीची मैत्री याचित्रपटात बघायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT