गोव्याची खाद्यसंस्कृती पुरातन आणि समृद्ध आहे.
विस्तृत किनारपट्टीमुळे काजू, कोकम, मासे, नारळ यांचा गोवन पद्धतीच्या खाद्यसंस्कृतीत वापर होतो.
जागतिक अन्नदिनानिमित्य गोव्यातील पाच महत्वाच्या गोष्टींची आपण माहिती घेऊ.
पाव हा गोमंतकीय खाद्यपदार्थांतील महत्वाचा भाग आहे. गोव्यात कात्र्याचे पाव, साधे पाव, पोळी, उंडे, केळे आणि जिरे यांचे बन, काकणे हे सर्वसामान्य प्रकार आहेत.
मासे हा गोवन जेवणातील प्रमुख भाग आहे. सुरमई ,पापलेट, मोरी, ट्युना, तारले, बांगडे हे प्रमुख मासे आहेत. खेकडे, शिंपले इ. सीफूडही गोव्यात चवीने खाल्ले जाते.
गोव्यातील करी आणि मसाले यांची वेगळी चव खवय्यांना आवडते. गोव्यात खोला आणि हरमल या दोन विशेष प्रकारच्या मिरच्या प्रामुख्याने वापरल्या जातात. त्यांना भौगोलिक मानांकनही लाभले आहे.
भौगोलिक मानांकन लाभलेली गोवा काजू फेणी जगप्रसिद्ध आहे. गोव्यातील लोक फार जुन्या काळापासून त्याचा वापर मद्य तसेच औषध म्हणून वापर करत आले आहेत.
गोव्यातील जत्रा आणि फेस्तमध्ये खाद्यपदार्थांची रेलचेल असते. जत्रा आणि फेस्तामधून हमखास घरी नेला जाणारा स्वादिष्ट पदार्थ म्हणजे खाजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.