वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर संघ विचारांचे बाळकडू घेतलेले दामोदर नाईक यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय. बालपण व तरुणपण संघर्षात जाऊनही ते जिद्दीने जीवनाला सामोरे गेले. दामोदर नाईक यांनी बस चालकाची भूमिकाही त्यांनी काही काळ बजावली होती.
दामू नाईक यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत फातोर्डा मतदारसंघात विविध विकासकामं केली आहेत. त्यांनी सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला आहे.
दामोदर नाईक यांनी १९९४ पासून भाजप कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. २०००-२००२ या काळात फातोर्डा भाजप मंडळाचे सरचिटणीस राहिलेत. तर २००२ व २००७ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेत.
२००२-२००५ या काळात दामोदर नाईक यांनी गोवा हस्तोद्योग ग्रामीण व लघुउद्योग विकास महामंडळांचं अध्यक्षपद भूषवलं आहे. २००६ मध्ये भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, २००७ मध्ये विधानमंडळ प्रवक्ते (भाजप) तर २०१२ पासून भाजपचे गोवा प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते राहिले आहेत.
नाट्य कार्यशाळा, संगीत महोत्सव, भजन कार्यशाळा 'घुमट वर्कशॉप', 'सुंदर फुलांची कला कार्यशाळा’ मनोरंजन सोसायटी, गोवा चित्रपट महोत्सव, नवीन चित्रपट धोरण विकास अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांचं त्यांनी आयोजन केलंय.
दामोदर (दामू) नाईक यांचा जन्म 6 सप्टेंबर 1971 रोजी झाला. मडगाव येथे झाला. त्यांनी कला शाखेतून (Bachelor of Arts) आपलं शिक्षण पूर्ण केलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.