Bungee jumping Dainik Gomantak
Image Story

Bungee jumping: भारतातील 'हे' आहेत प्रसिद्ध ठिकाण

कोणाला हील स्टेशनवर (Heel Station) फिरायला आवडते, तर कोणी साहसी खेळांचा आनंद घेतात.

दैनिक गोमन्तक

भारतात अनेक पर्यटन स्थळे (Tourist places) असून जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक (Tourists) जात असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांव्यतिरिक्त परदेशातून अनेक पर्यटक दरवर्षी येथे पोहोचतात आणि भरपूर आनंद घेतात. परंतु कोरोनामुळे (Corona) अनेक ठिकाणी लॉकडाउन (Lockdown) असल्याने पर्यटनावर (Tourists) बंदी घालण्यात आली होती. पण पुन्हा एकदा भारतातील जवळपास सर्व पर्यटन स्थळे (Tourist places) उघडली गेली आहेत. यामुळे मोठ्या संख्येने लोक त्यांच्या आवडत्या ठिकाणांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार लोक त्या त्या ठिकाणी भेटी देत आहेत. जसे कोणाला हील स्टेशनवर (Heel Station) फिरायला आवडते, तर कोणी साहसी खेळांचा आनंद घेतात. असाच एक साहसी खेळ म्हणजे बंजी जम्पिंग (Bungee jumping) होय. याची मज्जा वेगळीच असते. जर तुम्हाला अॅडव्हेंचर (Adventure) करण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणांना एकदा अवश्य भेट द्या.

* ऋषिकेश

कॅमपिंग, वॉटर स्पोर्ट्स याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही ऋषिकेश या ठिकाणी जाऊ शकता. तेथे तुम्ही बंजी जम्पिंगचाही (Bungee jumping) आनंद घेऊ शकता. येथे 83 मीटर उंचीवरुन उडी मारता येते.

* गोवा

गोव्याचे नाव एकल्यावर तेथील बीच, वॉटर स्पोर्ट्सचा नजारा डोळ्यासमोर येतो. परंतु गोव्यात बंजी जम्पिंगचा (Bungee jumping) देखील आनंद आपण घेवू शकतो. येथे 35 मीटर उंचीवरुन उडी मारता येते.

* लोणावळा

बंजी जम्पिंगसाठी (Bungee jumping) तुम्ही पुण्याजवळील लोणावळ्याला जाऊ शकता. हे ठिकाणी अॅडव्हेंचरसाठी अगदी योग्य आणि सुरक्षित मानले जाते. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने लोक अॅडव्हेंचरचा भरपूर आनंद घेतात. येथे 45 मीटर उंचीवरुन उडी मारल्या जाते.

* बंगळूर

बंगळूरचे नाव एकल्यावर आपल्या डोळ्यासमोर आयटी हब येतो. तेथील मोठमोठ्या कंपन्यांचे विचार येतात. येथे तुम्हाला क्रेनच्या सहाय्याने बंजी जम्पिंग (Bungee jumping) करता येते. परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते. येथे तुम्हाला 80 - 30 फुट उंचावरुन उडी मारली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT