Brown Rice Benefits | How to Loose Weight Dainik Gomantak
Image Story

वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राइस उपयुक्त

Health Benefits of Brown Rice: तुम्हाला वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर बिनधास्त खा ब्राऊन राईस

दैनिक गोमन्तक
heart

हृदयाच्या आरोग्यासाठी -

ब्राऊन राईस हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानला जातो. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकार रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा झाल्यामुळे होतात. ब्राऊन राईस हृदयाशी संबंधित विकारांपासून बचाव करतो.

Cholesterol

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात -

ब्राऊन राईस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. हे विरघळणारे फायबरचे स्त्रोत आहे, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढवते.

sugar

रक्तातील साखरेची पातळी -

ब्राऊन राईस खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. मधुमेह होण्याचा धोकाही खूप कमी होतो. ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो आणि तो हळूहळू पचतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यास मदत होते.

weight

वजन कमी करण्यासाठी -

ज्यां लोकांना वजन कमी करायचे आहे ते लोक जीमला न जाता वजन कमी करू शकतात. ब्राऊन राइसचा आहारात समावेश करावा. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि वारंवार खाणे टाळले जाते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

digestion

पचन सुधारते -

ब्राऊन राईस पचनासाठी देखील चांगला असतो. यामध्ये अघुलनशील फायबर असते जे पचन सुधारण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या आजारांपासून बचाव होतो.

bones

मजबूत हाडांसाठी -

हाडे मजबूत बनवण्यात ब्राऊन राइस महत्त्वाची भूमिका बजावते. खरं तर, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हाडांची घनता कमी होऊ शकते आणि ऑस्टियोपोरोसिस आणि संधिवात सारखे रोग होऊ शकतात. त्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT