Mithun Chakraborty
बॉलिवूड चित्रपटातील स्टार मिथुन चक्रवर्ती यांनी हल्लीच एक खुलासा केला आहे. की त्यांच्या सावळ्या रंगावरुन हिंदी चित्रपटांमध्ये अनेक वेळा त्यांचा अपमान केला गेला. त्यामुळे मिथुन यांचे सुरवातीचे आयुष्य खूप कठीण गेले आहे. 'मृगया' या पदार्पणाच्या चित्रपटासाठी मिथुन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांचा संघर्ष संपला नव्हता. आणि त्याच्या काळ्या रंगामुळे त्याच्यावर अनेकदा टीकाही झाल्या. तसेच, सिनेसृष्टीत आणखी काही स्टार्सबद्दल असे झाले आहे. ज्यांना त्यांच्या रंगासाठी वारंवार अपमानित व्हावे लागले.
Rekha
बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री रेखाने जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा तिला 'काली कलूटी' म्हटले गेले. रेखाचा सुरुवातीच्या काळात पूर्ण त्वचेचा रंग सावळा होता. त्यामुळे तिच्यावर कित्येक वेळा टीका करण्यात आल्या. पण, नंतर रेखाने असा मेकओव्हर केला की तिला पाहणारे थक्क झाले. रेखाचा 1970 साली आलेला 'सावन भादों' हा चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.
Ajay Devgan
अजय देवगणने जेव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तेव्हा लोकांनी त्याच्या रंगाची खिल्ली उडवली होती. अजय देवगणला त्याच्या रंगामुळे ही इंडस्ट्री सोडायची होती. पण, 'फूल और कांटे' या पहिल्या चित्रपटानंतर त्याला खूप लोकप्रियता मिळाली.
Nandita Das
नंदिता दासही तिच्या रंगामुळे अनेकदा टीकेचे शिकार व्हावे लागले आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, बॉलीवूडमधील गाण्यांनेही रंंगभेद वाढवण्यात मोठा हातभार लावला आहे. बर्याचदा गाण्यांचे बोल गोऱ्या रंगावर अनूसरुन असतात. त्यामध्ये गोरे रंग पे ना इतना गुमान कर, ते चिट्टियाँ कलाईयां वे पर्यंत अशी कितीतरी गाणी आहेत.
Bipasha Basu
बिपाशा बासूलातर सुरुवातीपासूनच तिच्या रंगावरुन टार्गेट करण्यात आले होते, पण ती तिच्या रंगाच्या जोरावरच स्टार बनली. बिपाशाने जेव्हा कोलकात्यात पहिल्यांदा सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली तेव्हा तिला आश्चर्य वाटलं की काळा रंग हा माझा खासपणा कसा असू शकतो? पण तिचा पहिला चित्रपट 'अजनबी' आला आणि लोकांना हा चित्रपट खूप आवडला होता.
Priyanka Chopra
प्रियांका चोप्राला देखील तिच्या रंगावरुन खूप चिडवले गेले आहे. इतकंच नाही तर, तिचा चुलत भाऊ तिला नेहमी काली काली म्हणत चिडवत असे. प्रियांका अमेरिकेत शिकत असताना तिला तिथले लोक तिच्या काळ्या रंगामुळे ब्राउनी म्हणून चिडवायचे. मात्र आज प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्येच नव्हे तर, हॉलीवूडमध्येही सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकीला देखील त्याच्या रंगावरुन टीकेचा सामना करावा लागला होता. नवाजुद्दीन सिद्दीकीला अनेक वर्षे चित्रपटांमधून नाकारण्यात आले होते. परंतु आज नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची स्टोरी त्या कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. ज्यांना आजही अशा समस्यांचा सामना करावा लागतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.