Karan Veer Mehra Dainik Gomantak
Image Story

Bigg Boss 18 Winner: दोनदा लग्न, दोन्ही वेळा घटस्फोट... 'बिग बॉस 18'चा विजेता करणवीर मेहरा नेमका आहे तरी कोण?

Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra : बिग बॉस 18'चा ग्रँड फिनाले पार पडला असून करणवीर मेहरानं विजेतेपदावर नाव कोरलं आहे.

Sameer Amunekar
Karan Veer Mehra

'बिग बॉस 18 चा विजेता

'बिग बॉस 18'चा ग्रँड फिनाले पार पडला असून करणवीर मेहरानं विजेतेपदावर नाव कोरलं आहे. 105 दिवसांच्या खेळानंतर अखेर या सिझनचा विजेता सूत्रसंचालक सलमान खाननं जाहीर केला. 'बिग बॉस 18'च्या सिझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते.

Karan Veer Mehra

टॉप 6 मधील स्पर्धक

विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे स्पर्धक टॉप 6 मध्ये होते. अंतिम लढत विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा या दोघांमध्ये झाली.

Karan Veer Mehra

50 लाख रुपये बक्षीस

फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलालला या शोमध्ये तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. करणवीर मेहराला 50 लाख रुपये बक्षीस आणि बिग बॉसची ट्रॉफी मिळाली आहे.

Karan Veer Mehra

पहिलं लग्न

करणवीरनं दोनदा लग्न केले आणि दोन्ही वेळा घटस्फोट घेतला आहे. करणनं पहिलं लग्न त्याची बालपणीची मैत्रीण देविका मेहरा हिच्याशी केलं. २००९ मध्ये करण आणि देविका यांचं लग्न झालं. मात्र, हे नातं जास्त काळ टिकलं नाही. २०१८ मध्ये करण आणि देविका यांनी घटस्फोट घेतला.

Karan Veer Mehra

टीव्ही अभिनेत्री दुसरं लग्न

करणवीरनं टीव्ही अभिनेत्री निधी सेठशी दुसरं लग्न केलं. करणवीर आणि निधीनं २०२१ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे नाते अवघ्या २ वर्षातच संपुष्टात आले. निधीने तर करणवीरशी लग्न करण्याचा निर्णय तिची सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं होतं.

Karan Veer Mehra

चित्रपटांमध्ये केलंय काम

करणवीर मेहरानं 2005 मध्ये ‘रिमिक्स’ या शोद्वारे करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘बिवी और मैं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. त्याने ‘रागिनी एमएमएस 2’, ‘मेरे डॅड की मारूती’, ‘ब्लड मनी’, ‘बदमाशियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय.

Karan Veer Mehra

मालिकांमध्ये महत्वाची भूमिका

करणवीर 'फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी 14'चाही विजेता ठरला होता. करणवीरनं 'पवित्र रिश्ता', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'परी हूँ मैं', 'बडे अच्छे लगते है', यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT