Goan Seafood Dainik Gomantak
Image Story

Goan Seafood: गोवन सीफूड प्रेमींनो 'या' 8 रेस्टारंट्सना नक्की भेट द्या! यादगार बनवा गोवा ट्रीप

Manish Jadhav
Goan Seafood

गोवा: दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. गोव्यावर निसर्गाची किमया तर झालीच आहे पण इथली खाद्यसंस्कृतीही प्रेमात पाडते.

Goan Seafood

गोवन फूड: गोव्याला येणारा प्रत्येकजण इथल्या प्रसिद्ध अशा गोवन फूडची चव नक्की चाखतो. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 'सीफूड्स' खायला मिळतात.

Goan Seafood

सीफूड्ससाठी प्रसिद्ध: गोव्यात सीफूड्ससाठी अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून सीफडूसाठी प्रसिद्ध 8 हॉटेल्सबद्दल जाणून घेणारोत.

Vinayak, Assagao

1. विनायक, आसगाव (Vinayak, Assagao): आसगाव येथील विनायक फॅमिली रेस्टॉरंटला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गोवन सीफूडची चव चाखायला मिळते. इथे तुम्ही खासकरुन व्हेज साइड्स, ड्राय सीफूड्स, बटर गार्लिक प्रॉन्झ, क्लॅम्स, विंदालू ट्राय करु शकता.

Souza Lobo, Calangute

2. सूझा लोबो, कळंगुट (Souza Lobo, Calangute): कळंगुटमधील 1932 पासून खवय्यांच्या सेवेत असणारे सूझा हॉटेलला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. इथे तुम्हाला खास गोवन मसाल्यांमधील सीफूड खायला मिळते.

Sharada Bar, Madgaon

3. शारदा बार, रेस्टारंट मडगाव (Sharada Bar, Madgaon): मडगावातील प्रसिद्ध शारदा रेस्टारंट खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला कालवा फ्राय, ड्रमस्टिक प्रॉन्झ करी, फिश थाळी, रेचेडो मसाला, किंगफिश थाळी, स्क्विड बटर फ्राय इत्यादीची तुम्हाला चव चाखायला मिळेल.

O Coqueiro, Porvorim

4. ओ कोक्वेइरो, पर्वरी (O Coqueiro, Porvorim): पर्वरीतील हे रेस्टारंट खवय्यांना मोहिनी घालंत. तुम्ही तुमच्या गोव्याच्या ट्रीपध्ये या रेस्टारंटला भेट देणं नक्की करा... अस्सल गोवन फूडची चव तुम्हाला इथे चाखायला मिळते.

Bhumiputra Restaurant, Pernem

5. भूमिपुत्र रेस्टॉरंट, पेडणे (Bhumiputra Restaurant, Pernem): तुम्ही गोवन फूडसाठी दिवाणे असाल तर तुम्ही पेडण्यातील भूमिपुत्र रेस्टारंटला नक्की भेट दिली पाहिजे. तुम्हाला इथे भूमिपुत्रची प्रसिद्ध 'जम्बो फिश थाळी' खायला मिळेल.

Fat Fish, Calangute

6. फॅट फिश, कळंगुट (Fat Fish, Calangute): गोवन फूडसाठी प्रसिद्ध कळंगुटमधील आणखी रेस्टारंट फॅट फिशला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. इथे तुम्हाला खासकरुन लॉबस्टर, स्क्विड, क्रब्स, फिंगर फूड, फॅट फिश ची चव चाखायला मिळते.

Seafood Junction, Calangute

7. सीफूड जंक्शन, कळंगुट (Seafood Junction, Calangute): कळंगुटमधील सीफूड जंक्शनला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे. इथे तुम्हाला गोवन मसाल्यांमधील सीफूड्स खायला मिळतात. तंदूर पदार्थ, चायनीज फ्यूजन स्नॅक्स, स्क्विड, क्रब्स, फिंगर फूडची चव चाखायला मिळते.

Martin’s Corner, Betalbatim

8. मार्टिन कॉर्नर, बेताळभाटी (Martin’s Corner, Betalbatim): बेताळभाटी येथील मार्टिन कॉर्नर रेस्टारंट खास तुमच्यासाठीच आहे. 1989 मध्ये सुरु झालेले रेस्टारंट खवय्यांसाठी पर्वणीच आहे. इथे तुम्हाला खासकरुन सॉरपोटेल ( व्हिनेगर आणि मसाल्यांमध्ये शिजवलेले मांस), गोवन सॉसेज ब्रेड, चायनीज फ्यूजन स्नॅक्स खायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT