Hollywood  Dainik Gomantak
Image Story

KGF, सैराट सारखे ब्लॉकबस्टर देणाऱ्या बॉलीवूड, टॉलीवूड व्यतिरिक्त देशात 26 फिल्म इंडस्ट्रीज

वेगवेगळ्या भाषांच्या सिनेमा इंडस्ट्रीजनी याच हॉलिवूडपासून प्रेरित होवून आपल्या फिल्म इंटस्ट्रीची नावं ठेवली आहेत

दैनिक गोमन्तक
Hollywood

List of Film Industries in India: हॉलिवूडने सिनेसृष्टीत जगात इतके विक्रम रचले आहेत की वेगवेगळ्या भाषांच्या सिनेमा इंडस्ट्रीजनी याच हॉलिवूडपासून प्रेरित होवून आपल्या फिल्म इंटस्ट्रीची नावं ठेवली आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात 27 फिल्म इंडस्ट्रीज आहेत, ज्यांची नावं ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसणार. यापैकी काही इंडस्ट्रीज आता बॉलीवूडला मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, मग तो सेंडलवुड सिनेमाचा 'KGF-2' असो किंवा टॉलीवूडचा 'बाहुबली'. मराठी, कन्नड आणि तमिळ सिनेमांनी गेल्या काही वर्षांत अनेक विक्रम मोडले आहेत. चला जाणून घेऊया अशा काही इंडस्ट्रीजबद्दल खास गोष्टी...

Tollywood

तमिळ-तेलुगू सिनेमा (टॉलिवूड)

बॉलीवूड व्यतिरिक्त, देशातील सर्वात मोठे बजेट आणि सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट आजकाल तामिळ-तेलुगू चित्रपट सृष्टितून येत आहेत. लोक या इंडस्ट्रीला टॉलिवूड म्हणतात. या इंडस्ट्रीतून रिलीज झालेल्या 'बाहुबली: द बिगिनिंग'ने भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम दिला आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने त्याचा विक्रम मोडला आणि 2200 कोटींची कमाई करून विक्रम केला. या वर्षीही 'RRR' 'पुष्पा' आणि 'विक्रम' सारख्या चित्रपटांनी देशात दबदबा निर्माण केला.

KGF

कन्नड सिनेमा (सेंडलवुड)

यशच्या 'केजीएफ' या चित्रपटाने कन्नड भाषेतील चित्रपटांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या इंडस्ट्रीला सेंडलवुड म्हणतात.

Malayalam

मल्याळम सिनेमा

हॉलिवूडच्या धर्तीवर मल्याळम चित्रपटसृष्टीचे नाव नसले तरी या इंडस्ट्रीने देशाला अनेक मोठे चित्रपट दिले आहेत. या इंडस्ट्रीतील लोकप्रिय चित्रपटांमध्ये ‘पुल्लीमुरुगन’चा समावेश आहे. मल्याळम सिनेमातील हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे.

Pollywood

पंजाबी सिनेमा (पॉलीवूड)

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीचे नाव संपूर्ण देशात आहे, तर गेल्या काही वर्षांत पंजाबी सिनेमानेही लोकांची मने जिंकली आहेत. ही इंडस्ट्री पॉलिवूड म्हणून ओळखली जातो. आता पॅन इंडियामधून अनेक पंजाबी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. पंजाबी इंडस्ट्रीमधून रिलीज झालेल्या 'किस्मत', 'कॅरी ऑन जट्टा'लाही हिंदी पट्ट्यात भरभरून दाद मिळाली.

Sairat

मराठी सिनेमा (मॉलीवुड)

मराठी सिनेसृष्टीला लोक मॉलीवूड म्हणून ओळखतात. ‘सैराट’ या चित्रपटाने देशाची मने इतकी जिंकली की जवळपास सर्वच भाषेत त्याचा रिमेक बनवला जात आहे. मराठी सिनेसृष्टी नेहमीच प्रसिद्ध आणि यशस्वी ठरली असली तरी 'सैराट' चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीला एक नवी ओळख दिली आहे. जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट 'धडक' हा सैराटचा रिमेक होता. त्याचबरोबर अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात.

Bhojpuri

भोजपुरी सिनेमा (बिहारवुड)

बिहारमध्ये बनवलेले भोजपुरी चित्रपटही लोकांना खूप आवडतात. लोक या इंडस्ट्रीला बिहारवुड म्हणून ओळखतात. रवी किशनसारखे कलाकार याच इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आले.

Bengali

बंगाली सिनेमा

चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहिला तर हिंदी चित्रपटसृष्टीपूर्वी बंगाली चित्रपटांची भरभराट झाली होती. या इंडस्ट्रीत सत्यजित रेसारखे तगडे चित्रपट निर्माते झाले आहेत. ज्यांना आजही चित्रपटसृष्टीचे प्रणेते मानले जाते.

Film Industry

इतर चित्रपट इंडस्ट्री

एवढेच नाही तर आपल्या देशात आसामी चित्रपट (जॉलीवूड), छत्तीसगढ़ी चित्रपट (छोलीवूड), गुजराती चित्रपट (गॉलीवूड), डॉलीवूड, पहारीवूड, इंग्रजी, हरियाणवी, जॉलीवूड, काश्मिरी, कोकबोरोक, कोकणी, मैथाई, नागपुरी, ऑलिवूड, राजस्थानी चित्रपट आहेत. संभलपुरी, संस्कृत, सॉलीवुड, सिंधी आणि तुळू चित्रपट इंडस्ट्रीतही चित्रपट बनवले. काहीजण सध्या छोट्या प्रमाणावर काम करत आहेत तर काहींनी देशभरात नाव मिळवले आहे. तेव्हा आता हे सांगणे कठीण आहे की, कुठल्या इंडस्ट्रीतून आणखी एक KGF बनेल आणि जगात आपले नाव करून लोकांची मने जिंकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवाडी ते पणजी फेरीसेवा

Saint Francis Xavier Exposition: गोंयचो सायब पावलो!! पाकिस्तानी भाविकांचा गोव्यात येण्याचा मार्ग मोकळा; व्हिसा मंजूर

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT