Abhishek Sharma Dainik Gomantak
Image Story

Abhishek Sharma: 24 वर्षीय अभिषेकचा जलवा! ICC रँकिंगमध्ये थेट दुसर्‍या स्थानी; अनेक दिग्गजांना सोडले मागे

Manish Jadhav
Abhishek Sharma

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत गरदा उडवून दिला. त्याने ताबडतोब 135 धावांची शानदार खेळी खेळली. याच खेळीचा आता त्याला आयसीसी रँकिंगमध्ये फायदा झाला.

Abhishek Sharma

टी20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानी

भारताच्या या डावखुऱ्या सलामीवीराने आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत अभिषेक 40 व्या स्थानी होता. पण इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीनंतर तो आता 38 खेळाडूंना मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Abhishek Sharma

अभिषेकने कोणत्या दिग्गजांना मागे टाकले?

आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत अभिषेक शर्माने अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. अभिषेकने फिल साल्ट, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जॉस बटलर, बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांसारख्या महान खेळाडूंना मागे सोडले आहे. अभिषेक शर्माची नवीन रँकिंग नंबर 2 असून त्याचे रेटिंग पॉइंट्स 829 एवढे आहेत. अभिषेकच्या पुढे ट्रॅव्हिस हेड आहे जो 855 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानी आहे. जर अभिषेकने दुसऱ्या टी-20 सामन्यात तूफानी खेळी खेळली असती तर तो ट्रॅव्हिस हेडच्याही पुढे गेला असता.

Abhishek Sharma

या कामगिरीचा फायदा

अभिषेकने इंग्लंडविरुद्ध अफलातून खेळी खेळली, ज्याचा फायदा त्याला क्रमवारीत तब्बल 38 खेळाडूंना मागे सोडण्यात झाला. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत अभिषेकने 55.80 च्या सरासरीने 279 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत एक शतक आणि एक अर्धशतक आहे. अभिषेकने या खेळीत 22 षटकार आणि 24 चौकार लगावले.

Abhishek Sharma

आयसीसीची नवीन टी-20 क्रमवारी

हेड आणि अभिषेक शर्मा वगळता सर्व खेळाडूंना टी-20 क्रमवारीत मोठा धक्का बसला. तिलक वर्मा एका अंकाने घसरुन तिसऱ्या स्थानी पोहोचला. तर टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानी पोहोचला. जोस बटलर सहाव्या स्थानी आहे. बाबर 7व्या, निस्सांका 8व्या, रिझवान 9व्या आणि कुसल परेरा 10व्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या अव्वल स्थानी कायम आहे. गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT