Auspicious gifts by Rashi Dainik Gomantak
Horoscope

Astrology Gifts: भेट देताना रास बघा! ज्योतिषशास्त्रानुसार 'या' वस्तू ठरतील बहिणीसाठी शुभ

Zodiac based gifts for sister: ज्योतिषशास्त्रानुसार, राशीनुसार निवडलेली भेटवस्तू बहिणीच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणते आणि तुमचं नातं अधिक दृढ करते

Akshata Chhatre

Best gifts for sister based on zodiac: येत्या ९ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी, भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव म्हणजेच 'रक्षाबंधन' साजरा होणार आहे. आजकाल राखी बांधणे आणि ओवाळणे यासोबतच भेटवस्तूंची देवाणघेवाण ही या सणाची एक महत्त्वाची परंपरा बनली आहे. पण यावेळी तुम्ही काहीतरी वेगळं करा, बहिणीला अशी भेट द्या, जी तिच्या राशीनुसार असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, राशीनुसार निवडलेली भेटवस्तू बहिणीच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणते आणि तुमचं नातं अधिक दृढ करते.

मेष, वृषभ आणि मिथुन

मेष: जर तुमची मेष राशीची बहीण उत्साही आणि धाडसी असेल, तर तिला लाल रंगाच्या वस्तू आवडतील. तुम्ही तिला एक स्टायलिश लाल रंगाचा पर्स किंवा ड्रेस गिफ्ट करू शकता. लाल रंगाचा सुगंध असणारा परफ्यूमही तिच्यासाठी शुभ ठरेल.

वृषभ: वृषभ राशीच्या बहिणीला आराम आणि सौंदर्य आवडते. तिच्यासाठी चॉकलेट्स, डिझायनर कपडे, चांगला परफ्यूम किंवा हिऱ्याची ज्वेलरी हा उत्तम पर्याय आहे. हे गिफ्ट्स तिच्या जीवनशैलीला साजेशी असतील.

मिथुन: मिथुन राशीच्या बहिणीला नवीन गोष्टी शिकायला आणि तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टींमध्ये रस असतो. तिला एखादे वाचायला आवडेल असे पुस्तक, नवीन स्मार्ट गॅजेट किंवा स्टायलिश पेन नक्कीच आवडेल.

कर्क, सिंह आणि कन्या

कर्क: कर्क राशीच्या बहिणी भावूक आणि संवेदनशील असतात. त्यांना भावनात्मक गोष्टी आवडतात. एक सुंदर फोटो फ्रेम, चांदीच्या बांगड्या किंवा चांदीचे दागिने तिला भेट दिल्यास ती खूप आनंदी होईल.

सिंह: सिंह राशीची बहीण रॉयल आणि आकर्षक गोष्टींची शौकीन असते. तिला ब्रँडेड मेकअप किट, सोन्याचे दागिने किंवा महागडे घड्याळ भेट दिल्यास तिचा आनंद गगनात मावणार नाही. तिच्या शाही व्यक्तिमत्वाला हे गिफ्ट्स शोभून दिसतील.

कन्या: कन्या राशीच्या बहिणीला सुबक आणि व्यावहारिक वस्तू आवडतात. तुम्ही तिला एक चांगला हँडबॅग, पर्स किंवा स्किन केअर संबंधित उत्पादने देऊ शकता, जी तिला तिच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील.

तुळ, वृश्चिक आणि धनु

तुळ: तुला राशीच्या बहिणींना फॅशन खूप महत्त्वाची वाटते. त्यांच्यासाठी फॅशन ज्वेलरी, ब्रँडेड परफ्यूम किंवा सुंदर साडी हा एक उत्तम पर्याय आहे.

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या बहिणींना काहीतरी खास आणि वेगळे गिफ्ट आवडते. कॉस्मेटिक वस्तू, रुद्राक्षाचे लॉकेट तिला भेट दिल्यास ती खूप खुश होईल.

धनु: धनु राशीच्या बहिणींना ज्ञान आणि प्रवास खूप आवडतो. त्यांना धार्मिक ग्रंथ, ज्ञानवर्धक पुस्तके किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी ट्रॅव्हल पॅकेज भेट देणे हा एक चांगला विचार आहे.

मकर, कुंभ आणि मीन

मकर: मकर राशीच्या बहिणी व्यावसायिक आणि व्यावहारिक विचारांच्या असतात. तुम्ही तिला ऑफिस डायरी, पेन स्टँड किंवा तिच्या कामाच्या ठिकाणी उपयुक्त ठरतील अशी व्यावसायिक कपडे गिफ्ट करू शकता.

कुंभ: कुंभ राशीच्या बहिणींना तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये खूप रस असतो. स्मार्टफोन, स्मार्टवॉच किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित पुस्तके तिला भेट दिल्यास ती नक्कीच प्रभावित होईल.

मीन: मीन राशीच्या बहिणींना आध्यात्मिकता आणि कलात्मक गोष्टी आवडतात. त्यांना देवाच्या मूर्ती किंवा संगीत ऐकण्यासाठी एअरपॉड्ससारख्या वस्तू भेट दिल्यास त्यांना आनंद होईल आणि मनःशांती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

SCROLL FOR NEXT