Shukra Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Shukra Gochar 2026: 29 जुलैला ब्रह्मांडात सर्वात मोठी खळबळ! लक्झरी लाईफ अन् अथांग संपत्तीचा कारक बदलणार नक्षत्र; 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार

Shukra Gochar In Sun Nakshatra 2026: ज्योतिषशास्त्रात सुख, संपत्ती, कला, सौंदर्य, प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह लवकरच आपले नक्षत्र बदलणार आहे.

Manish Jadhav

Shukra Gochar In Sun Nakshatra 2026: ज्योतिषशास्त्रात सुख, संपत्ती, कला, सौंदर्य, प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह लवकरच आपले नक्षत्र बदलणार आहे. 29 जुलै रोजी पहाटे 4 वाजून 56 मिनिटांनी शुक्र ग्रह 27 नक्षत्रांपैकी 12व्या म्हणजेच 'उत्तरा फाल्गुनी' नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्राचा स्वामी ग्रहांचा राजा सूर्य आहे.

शुक्र आणि सूर्याच्या या नक्षत्रातील प्रभावामुळे हा गोचर अनेक राशींच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. एकूण 12 राशींपैकी अशा 5 भाग्यवान राशी आहेत, ज्यांच्यावर या नक्षत्र परिवर्तनामुळे शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे आणि 29 जुलैच्या नंतरचा काळ त्यांच्यासाठी प्रचंड प्रगतीचा आणि सुखाचा असणार आहे.

या बदलाचा पहिला मोठा फायदा मेष राशीच्या व्यक्तींना होणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांनी व्यवसायात अतिशय विचारपूर्वक घेतलेले निर्णय दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. याशिवाय कुटुंबातील सदस्यांचे एखाद्या महत्त्वाच्या कामात पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांमधील जिव्हाळा आणि गोडवा आणखी वाढेल.

दुसरी भाग्यवान रास म्हणजे मिथुन. मिथुन राशीच्या महिलांच्या सौंदर्यात आणि त्वचेमध्ये कमालीची सुधारणा होईल, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखादी मालमत्ता किंवा जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर या काळात तुम्हाला त्यात यश मिळेल. तसेच आरोग्याच्या (Health) जुन्या समस्यांवर योग्य वेळी उपचार मिळाल्याने प्रकृतीत उत्तम सुधारणा होईल.

तिसरी रास म्हणजे सिंह. या काळात सिंह राशीच्या लोकांचा धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल, ज्यामुळे ते कोणत्याही चुकीच्या संगतीत किंवा प्रवृत्तीत अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकतील. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी केलेले तुमचे प्रयत्न या काळात यशस्वी होतील आणि प्रेम जीवनाचा विचार केला तर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात राहील.

चौथी भाग्यवान रास म्हणजे तूळ. या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जीवनसाथीची (जोडीदाराची) खंबीर साथ लाभेल, ज्यामुळे ते कोणत्याही कठीण समस्येचा सामना अतिशय सहजतेने करु शकतील. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना कामाच्या ठिकाणी एखादी मोठी उपलब्धी किंवा पदोन्नती (Promotion) मिळण्याची दाट शक्यता आहे.

पाचवी आणि शेवटची रास म्हणजे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ थकीत पैसे मिळवून देणारा ठरेल. तुम्ही अनेक वर्षांपूर्वी एखाद्याला दिलेले मोठे कर्ज किंवा उधार दिलेले पैसे या काळात अनपेक्षितपणे परत मिळू शकतात, ज्यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळेल. कुटुंबासोबत शहराबाहेर एखाद्या सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याची उत्तम संधी तुम्हाला लाभेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि शारीरिक सुखात वाढ होईल. एकंदरीत, शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन या पाच राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणारे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अ‍ॅडवायझरी जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

Goa crime: 'लडकी चाहिए क्या?’... पुढे सुरू होतो लुटीचा खेळ

SCROLL FOR NEXT