Yuti Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

Venus Jupiter Conjunction June 2026: 10 जून 2026 रोजी पहाटे 1 वाजून 26 मिनिटांनी शुक्र आणि गुरु एकमेकांपासून 0 अंशावर येतील. या वेळेपासूनच युती योगाचा प्रभाव सुरु होईल, जो दीर्घकाळ टिकणारा आहे.

Manish Jadhav

Shukra Guru Yuti Benefits: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची युती ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 0 अंशावर स्थित असतात, तेव्हा त्याला 'युति योग' असे म्हणतात. जून 2026 मध्ये आकाशात असाच एक अत्यंत शुभ आणि प्रभावशाली योग जुळून येत आहे. देवगुरु बृहस्पती (गुरु) आणि दैत्यगुरु शुक्र हे दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रह 10 जून रोजी एकमेकांशी युती करणार आहेत. हे दोन्ही ग्रह सुख, समृद्धी, ज्ञान आणि वैभवाचे कारक असल्याने या युतीचा सकारात्मक परिणाम अनेक राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. विशेषतः चार राशींसाठी हा काळ वरदान ठरणार आहे.

द्रिक पंचांगानुसार, 10 जून 2026 रोजी पहाटे 1 वाजून 26 मिनिटांनी शुक्र आणि गुरु एकमेकांपासून 0 अंशावर येतील. या वेळेपासूनच युती योगाचा प्रभाव सुरु होईल, जो दीर्घकाळ टिकणारा आहे. या युतीमुळे मेष, कर्क, तूळ आणि कुंभ या चार राशींच्या जातकांना भाग्याची भक्कम साथ मिळणार असून त्यांच्या रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे.

मेष राशीच्या जातकांसाठी ही युती अत्यंत आनंदाची बातमी घेऊन येईल. एकापाठोपाठ एक अनेक कामे यशस्वी झाल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य (Health) उत्तम राहील. जर तुम्ही दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल, तर या काळात प्रकृतीत मोठी सुधारणा दिसून येईल. विशेष म्हणजे, मालमत्तेशी संबंधित कोणताही मोठा व्यवहार करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे, ज्यातून तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळू शकतो.

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्तेचा असेल. पैशांची चणचण दूर झाल्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. तुम्हाला एकापाठोपाठ एक अचानक अनेक शुभ बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या विचारांना आणि मतांना महत्त्व देतील, ज्यामुळे नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मधुर होतील.

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग वर्तमानात जगण्याची प्रेरणा देणारा ठरेल. भविष्याची चिंता सोडून तुम्ही आजचा दिवस आनंदाने व्यतीत कराल. नोकरी-व्यवसायातील व्यस्ततेतून वेळ काढून तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकाल. घरच्यांसाठी एखादी महागडी वस्तू किंवा भेटवस्तू खरेदी करण्याचे योग आहेत, ज्यामुळे घरातील आनंद द्विगुणित होईल.

तूळ राशीचे जातक आपल्या आईची एखादी जुनी इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी होतील, ज्यामुळे तुम्हाला आत्मिक समाधान लाभेल. या काळात तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवाल. आर्थिक चणचण तुम्हाला मुळीच जाणवणार नाही. या युतीचा एक मोठा फायदा म्हणजे, तुमच्या पाठीमागे कारस्थान करणाऱ्या गुप्त शत्रूंचे चेहरे तुमच्यासमोर येतील, ज्यामुळे तुम्ही सावध होऊ शकाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

VIDEO: "मैदानात षटकार, स्टँड्समध्ये हाहाकार!" प्रियांश आर्याच्या शॉटनं चाहता जखमी; रक्तानं माखलेला व्हिडिओ व्हायरल

सत्तरीतील बंधारे बनले मद्यपींचे अड्डे! नदीपात्रात बाटल्यांचा खच आणि हुल्लडबाजी; उस्ते गावात मद्यपींचा धिंगाणा

Goa University : ‘बीए-एलएलबी एन्‍ट्रन्‍स’ निकालात पुन्‍हा घोळ; पालक साशंक, विद्यापीठाने बदलली 9 विद्यार्थ्यांची मेरीट लिस्‍ट

Israel Lebanon Conflict: "गाझासारखचं लेबनॉनही उद्ध्वस्त करणार!" इस्रायली संरक्षण मंत्र्यांची गर्जना; हिजबुल्लाचा 10 वर्षांचा प्लॅन धुळीला VIDEO

SCROLL FOR NEXT