Surya Gochar 2026 Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, मान-सन्मान मिळणार! सूर्य देवाच्या कृपेनं 'या' राशींचं नशीब चमकणार

Surya Gochar 2026 Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह मार्च २०२६ मध्ये एकामागून एक चार वेळा आपली नक्षत्रे आणि राशी बदलणार आहे.

Sameer Amunekar

ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह मार्च २०२६ मध्ये एकामागून एक चार वेळा आपली नक्षत्रे आणि राशी बदलणार आहे. सूर्याचे हे राशी परिवर्तन मानवी जीवनातील आत्मविश्वास, आरोग्य, मान-सन्मान आणि वडिलांशी असलेल्या संबंधांवर थेट परिणाम करते. पंचांगानुसार, मार्च महिन्यात होणाऱ्या या चार मोठ्या ज्योतिषीय घटनांमुळे काही राशींच्या आयुष्यात सुवर्णकाळ सुरू होणार आहे.

सूर्याचा मार्चमधील प्रवास: महत्त्वाच्या तारखा

मार्च महिना ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत वेगवान ठरणार आहे. सूर्याचे गोचर खालीलप्रमाणे होईल:

  • ५ मार्च (पहाटे १२:५९): पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश.

  • १५ मार्च (पहाटे ०१:०८): मीन राशीत प्रवेश.

  • १८ मार्च (सकाळी ०९:२७): उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश.

  • ३१ मार्च (रात्री ०८:१६): रेवती नक्षत्रात प्रवेश.

या ३ राशींना लाभ

१. मेष: मेष राशीच्या लोकांसाठी मार्च महिना प्रगतीचा ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन उत्साहात वाढ होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आर्थिक संकटातून तुमची सुटका होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कौटुंबिक वादात घट होऊन नात्यांमधील ओलावा वाढेल.

२. कर्क: कर्क राशीच्या जातकांसाठी हे गोचर वरदान ठरेल. वडिलांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे घरातील तणाव कमी होईल. अविवाहित लोकांसाठी नातेवाईकांकडून विवाहाचे उत्तम प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिना आर्थिकदृष्ट्या स्थिर राहील, ज्यामुळे तुम्ही बचतीवर लक्ष केंद्रित करू शकाल.

३. वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे बदल शुभ संकेत घेऊन येत आहेत. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांच्या नात्यात गोडवा वाढेल आणि जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवता येईल. घराच्या प्रमुखाचे आरोग्य सुधारेल आणि आर्थिक चणचण भासणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT