Surya Gochar 2026: ज्योतिष शास्त्रात सूर्य ग्रहाला केवळ एक ग्रह न मानता 'ग्रहांचा राजा' आणि प्रत्यक्ष 'देव' म्हणून संबोधले जाते. मान-सन्मान, आत्मा, ऊर्जा, उत्तम आरोग्य आणि नेतृत्व क्षमतेचा कारक असलेला सूर्य देव जेव्हा आपले नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. वर्षाच्या शेवटी, 29 डिसेंबर 2025 रोजी सूर्याने आपले 2025 मधील शेवटचे गोचर पूर्ण केले.
यावेळी सूर्य देवाने 'पूर्वाषाढा' नक्षत्रात प्रवेश केला असून या नक्षत्राचा स्वामी प्रेमाचा कारक असलेला 'शुक्र' ग्रह आहे. हे महत्त्वपूर्ण संक्रमण 29 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान झाले असून, सूर्य आता 11 जनवरी 2026 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत याच नक्षत्रात स्थिर राहणार आहे. सुमारे 14 दिवसांच्या या कालावधीनंतर सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रातून बाहेर पडून उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. या अल्पशा कालावधीत काही ठराविक राशींच्या जातकांसाठी भाग्योदयाचे योग निर्माण होत आहेत.
सूर्याचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदाची मोठी भेट घेऊन आले आहे. 11 जानेवारी पर्यंतच्या या काळात मिथुन राशीच्या नोकरीपेशा व्यक्तींना कार्यक्षेत्रात कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार नाही, अशी चिन्हे आहेत.
उलट, कामाचा ताण आणि दबाव कमी झाल्यामुळे तुम्हाला नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी किंवा आपल्या छंदांना वेळ देण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ विस्ताराचा ठरेल; तुमच्या उद्योगाशी नवीन व्यावसायिक भागीदार जोडले जातील, ज्यामुळे भविष्यात व्यवसायाला एक वेगळी उंची गाठता येईल. एकूणच, मिथुन राशीसाठी हा काळ करिअरमध्ये स्थैर्य आणि मानसिक शांतता प्रदान करणारा ठरेल.
धनु राशीच्या जातकांसाठीही सूर्याचे हे गोचर अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक असेल. या काळात तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावर लगाम घालण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याच्या शक्यताही नाकारता येत नाहीत.
विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी एखाद्या ओळखीच्या किंवा परिचयातील व्यक्तीच्या मदतीने तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून किंवा गुंतागुंतीच्या समस्येतून सहजरित्या बाहेर पडू शकाल. केवळ आर्थिक आणि व्यावसायिक पातळीवरच नाही, तर वैयक्तिक जीवनातही धनु राशीच्या विवाहित जातकांसाठी हे 14 दिवस अतिशय संस्मरणीय ठरणार आहेत. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल आणि प्रेम जीवनात गोडवा वाढेल.
या दोन राशींशिवाय कुंभ राशीच्या लोकांनाही सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाचा मोठा लाभ मिळणार आहे. 11 जानेवारी पर्यंत कुंभ राशीचे भाग्य अतिशय प्रबळ असेल. या काळात तुमच्यामध्ये बजेट आखून आणि नियोजित पद्धतीने खर्च करण्याची एक नवीन कला विकसित होईल, जी भविष्यातील गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरेल. विशेषतः या राशीतील वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ व्यक्तींना सामाजिक क्षेत्रात मोठा मानसन्मान आणि लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
तसेच, विवाहित जातकांसाठी हा काळ रोमान्सने भरलेला असेल; तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार आणि रोमँटिक वेळ घालवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या जातकांना जीवनातील विविध आघाड्यांवर यश आणि समाधान मिळवून देणारे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.