Surya Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2026: 31 ऑगस्टला सूर्याचा ‘पूर्वाफाल्गुनी’ नक्षत्रात महाधमाका! 'या' 5 राशींची चांदीच चांदी; मिळणार राजासारखे वैभव

Surya Gochar August 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांपैकी 11 वे नक्षत्र असलेल्या ‘पूर्वा फाल्गुनी’ नक्षत्राला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या नक्षत्राचा स्वामी ऐश्वर्य आणि सौंदर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह आहे.

Manish Jadhav

Surya Gochar August 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांपैकी 11 वे नक्षत्र असलेल्या ‘पूर्वा फाल्गुनी’ नक्षत्राला अत्यंत विशेष महत्त्व आहे. या नक्षत्राचा स्वामी ऐश्वर्य आणि सौंदर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह आहे. कला, संगीत, सौंदर्य आणि विलासी जीवनशैलीशी या नक्षत्राचा थेट संबंध जोडला जातो. सध्या सिंह राशीत फिरत असलेले ग्रहांचे राजे सूर्यदेव आता शुक्राच्या याच सुख-वैभवाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. दृक पंचांगानुसार, 31 ऑगस्ट रोजी सूर्य मघा नक्षत्र सोडून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात गोचर करतील. सूर्याच्या या नक्षत्र बदलामुळे लोकांच्या राहणीमानात, विचारसरणीत आणि एकूणच जीवनशैलीत मोठे बदल पाहायला मिळतील.

ज्योतिषाचार्य हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, सूर्याच्या या परिवर्तनामुळे लोकांमध्ये एक राजेशाही थाट पाहायला मिळेल, तसेच कला, संगीत, चित्रकला, अभिनय, फॅशन आणि मनोरंजन क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना प्रगतीचे अनेक नवीन मार्ग खुले होतील. या गोचरचा प्रभाव सर्व राशींवर होणार असला, तरी 5 राशींसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे.

या बदलामुळे मेष राशीच्या जातकांच्या करिअरला एक नवी दिशा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमची खरी क्षमता दाखवण्याची संधी मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची विशेष दखल घेतील. व्यवसायात मार्केटिंग आणि प्रमोशनच्या जोरावर मोठा आर्थिक फायदा होईल, तसेच जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित होईल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल, मात्र विलासी वस्तूंच्या खरेदीवर खर्च वाढल्याने बजेट सांभाळावे लागेल.

दुसरीकडे, मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर कमाई आणि जनसंपर्क वाढवणारे ठरेल. नोकरीतील महत्त्वाच्या बैठका तुमच्या बाजूने लागतील आणि फ्रीलान्सर्सना मोठे प्रोजेक्ट मिळतील. जुन्या ओळखींचा अचानक फायदा होऊन उत्पन्नाचे (Income) नवीन स्रोत निर्माण होतील.

तूळ राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी उत्कृष्ट ठरेल. तुमच्या सर्जनशील विचारांमुळे नोकरीत मोठी पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील आणि विद्यार्थ्यांसाठी मुलाखती किंवा स्पर्धा परीक्षेत यशाचे मार्ग खुले होतील. धनु राशीच्या जातकांना या काळात नवीन क्षेत्रांमध्ये नशीब आजमावण्याची संधी मिळेल. नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरातून किंवा मोठ्या कंपन्यांकडून आकर्षक ऑफर येऊ शकतात. जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील.

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर अचानक धनलाभाच्या आणि प्रगतीच्या सुवर्णसंधी घेऊन येईल. डिजिटल किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मोठा फायदा होईल आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे व्यवसायात वृद्धी होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, मात्र अतिआत्मविश्वास टाळणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT