Surya Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

Sun Mercury Sign Transit Astrological Benefits: द्रिक पंचांगानुसार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी सूर्यदेव आपली स्वराशी सिंह सोडून मित्र ग्रह बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करते झाले आहेत.

Manish Jadhav

Sun Mercury Sign Transit Astrological Benefits: द्रिक पंचांगानुसार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी सूर्यदेव आपली स्वराशी सिंह सोडून मित्र ग्रह बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करते झाले आहेत. ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या या राशी बदलाला 'कन्या संक्रांति' म्हटले जाते. कन्या राशी ही पृथ्वी तत्त्वाची राशी असून बुद्धी, आरोग्य, सेवा आणि धन-धान्याची कारक मानली जाते. ज्योतिषाचार्यांच्या मते, कन्या राशीत सूर्याच्या गोचरामुळे सूर्याची आक्रमकता आणि उष्णता मंदावते, ज्यामुळे पृथ्वीला दिलासा मिळतो. याच्या प्रभावाने माणसांमधील शिस्त आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता वाढीस लागते. सूर्याचे हे राशी परिवर्तन प्रामुख्याने पाच राशींच्या जातकांसाठी यश आणि आर्थिक समृद्धी घेऊन आले.

मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर सहाव्या भावात झाले असून ते करिअरसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. यामुळे 'शत्रुहंता योग' निर्माण होत असल्याने शत्रू आणि विरोधकांचा पराभव होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळेल आणि जुने कर्ज फेडण्यात यश येईल. कर्क राशीच्या तिसऱ्या भावात सूर्याचे हे गोचर पराक्रम वाढवणारे आणि नेटवर्क मजबूत करणारे ठरेल. मीडिया, डिजिटल क्रिएशन आणि ट्रॅव्हल क्षेत्रातील लोकांना मोठा धनलाभ होईल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय आर्थिक स्थिती भक्कम करतील आणि सर्व प्रवासांत यश लाभेल.

तुळ राशीच्या 12व्या भावात सूर्याचा प्रवेश झाल्याने खर्चावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल आणि कौटुंबिक बजेटमध्ये सुधारणा होईल. बहुराष्ट्रीय कंपन्या, एक्सपोर्ट आणि अध्यात्म क्षेत्राशी संबंधित लोकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल, तसेच विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होईल. वृश्चिक राशीच्या 11व्या भावात म्हणजे लाभ भावात सूर्याचे गोचर झाल्याने सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि सोशल मीडियाशी जोडलेल्या लोकांच्या उत्पन्नात (Income) अचानक प्रचंड वाढ होईल आणि नवीन घर किंवा गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

धनु राशीच्या 10व्या भावात सूर्याचे हे गोचर कर्म आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानले जात आहे. येथे सूर्याला दिग्बल प्राप्त झाल्याने त्याची शक्ती अधिक वाढली आहे. राजकारण, प्रशासकीय सेवा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना पदोन्नती आणि इच्छित स्थळी बदल्याचे योग आहेत. एकंदरीत, सूर्याचे हे कन्या राशीतील गोचर या पाच राशींसाठी प्रगती आणि भरभराटीची नवी दारे उघडणारे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Story: 21 पत्नी, पण 8 जणींचीच नावं लक्षात! भीक मागण्यासाठी रोज एका पत्नीला सोबत नेतो 'हा' बांगलादेशी; व्हिडीओ व्हायरल

Tilak Varma T20 Record: 5 शतके आणि 30 अर्धशतके! टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा महापराक्रम, किंग कोहलीला सोडले मागे

FDA Raid:गोव्यात एफडीएचा दणका!बार्देशमधील 4 हॉटेल्स-विक्री केंद्रांचे कामकाज बंद करण्याचे आदेश

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT