Surya Gochar 2026: ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचा राजा मानला जाणाऱ्या सूर्यदेवाने आज, 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला. सूर्याचा हा नक्षत्र बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण धनिष्ठा हे मंगळ ग्रहाचे नक्षत्र आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते आणि अशा पराक्रमी सेनापतीच्या नक्षत्रात जेव्हा ग्रहांचा राजा सूर्य प्रवेश करतो, तेव्हा त्याचे पडसाद सर्व राशींवर उमटतात. विशेषतः 4 राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा ठरणार असून त्यांच्या जीवनात धन-धान्य आणि सुख-समृद्धीची मोठी भरभराट होणार आहे.
वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचा धनिष्ठा नक्षत्रातील हा प्रवेश अत्यंत भाग्याचा ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात अनपेक्षित वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते या काळात परत मिळू शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायदेशीर असून व्यवसायात मोठी प्रगती आणि आर्थिक नफा मिळण्याचे योग आहेत. एकंदरीतच वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक स्थैर्य देणारा ठरणार आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर नेहमीच महत्त्वाचे असते कारण सूर्य हा या राशीचा स्वामी आहे. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे आता पूर्णत्वास जातील. जर तुम्ही व्यापारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अतिशय योग्य आहे, कारण भविष्यात त्यातून मोठा लाभ मिळू शकतो. तुमच्या सुख-सोयींमध्ये वाढ होईल आणि पैशांची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असून तुम्हाला हवी तशी नवीन नोकरी मिळण्याचे शुभ संकेत आहेत.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही सूर्याचा हा बदल शुभ वार्ता घेऊन आला आहे. या राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल आणि नफ्याचे प्रमाण वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयात वरिष्ठांचे मोलाचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमची कामगिरी सुधारेल. उत्पन्नात वाढ होण्यासोबतच पगारवाढ किंवा बोनस मिळण्याचेही योग आहेत. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जाईल.
कुंभ राशीच्या जातकांच्या उत्पन्नात या काळात जबरदस्त उसळी पाहायला मिळू शकते. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. शेअर बाजार किंवा मालमत्ता (Property) खरेदी-विक्रीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल आणि समाजात तुमचे वजन वाढेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कायदेशीर किंवा कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. सूर्याच्या या कृपेमुळे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनातील अडचणी दूर होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.