Surya Gochar  Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2026: सूर्याची महाचाल 3 राशींसाठी ठरणार 'जॅकपॉट'! पैशांची चिंता कायमची मिटणार; उत्पन्नात होणार बंपर वाढ

Surya Nakshatra Parivartan Benefits: सध्या सूर्यदेव बुध ग्रहाच्या मालकीच्या 'अश्लेषा' नक्षत्रात विराजमान असून 17 ऑगस्टपर्यंत ते याच नक्षत्रात राहतील.

Manish Jadhav

Surya Nakshatra Parivartan Benefits: ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा आणि आत्म्याचा कारक मानले जाते. जेव्हा जेव्हा सूर्यदेव आपल्या राशीत किंवा नक्षत्रात बदल करतात, तेव्हा त्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर आणि सर्व 12 राशींवर पडतो. सध्या सूर्यदेव बुध ग्रहाच्या मालकीच्या 'अश्लेषा' नक्षत्रात विराजमान असून 17 ऑगस्टपर्यंत ते याच नक्षत्रात राहतील. यानंतर सूर्यदेव मघा नक्षत्रात प्रवेश करतील. बुध ग्रहाच्या नक्षत्रात सूर्याचे हे गोचर अत्यंत शुभ मानले जात असून, यामुळे अनेक राशींच्या आयुष्यात सकारात्मकतेचा आणि आनंदाचा नवा अध्याय सुरु होणार आहे. या नक्षत्र परिवर्तनाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक फायदा वृषभ, कन्या आणि वृश्चिक या 3 राशींच्या जातकांना होणार आहे.

वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र गोचर अतिशय लाभदायक ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही कठीण आव्हानांवर सहज मात कराल. नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून येतील. व्यापारी वर्गासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार असून, एखादी मोठी आणि महत्त्वाची डील फायनल झाल्यामुळे मोठा आर्थिक नफा मिळेल. तसेच कौटुंबिक जीवनात सुख-शांती आणि आनंदाचे वातावरण राहील.

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचे हे गोचर भाग्योदय करणारे ठरेल. करिअरच्या (Career) क्षेत्रात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रदीर्घ काळापासून अडकलेले किंवा कोणाला दिलेले उधार पैसे या काळात अचानक परत मिळण्याचे उत्तम योग आहेत. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि नियोजित कामे विनाअडथळा पूर्ण होतील.

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचे नवे मार्ग खुला करणारा ठरेल. व्यापारी वर्गाला व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे आर्थिक बचत करण्यात यश येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरेल. याशिवाय तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. एकंदरीत, वृषभ, कन्या आणि वृश्चिक या 3 राशींसाठी सूर्याचे अश्लेषा नक्षत्रातील गोचर यश, समृद्धी आणि धनलाभाचा सुवर्णकाळ घेऊन आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

SCROLL FOR NEXT