Shukra Pushkaransh Yog Dainik Gomantak
Horoscope

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Shukra Pushkaransh Yog Benefits: वैदिक ज्योतिषात कोणत्याही ग्रहाची 'पुष्करांश' स्थिती ही कुंडलीतील अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानली जाते.

Manish Jadhav

Shukra Pushkaransh Yog Benefits: वैदिक ज्योतिषात कोणत्याही ग्रहाची 'पुष्करांश' स्थिती ही कुंडलीतील अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानली जाते. त्यातच सौंदर्य, संपत्ती, प्रेम आणि वैवाहिक सुखाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह जेव्हा पुष्करांशात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा शुभ प्रभाव कित्येक पटींनी वाढतो. यंदा 15 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या हरियाली तीजच्या पार्श्वभूमीवर 'शुक्र पुष्करांश' हा अतिशय दुर्मिळ अन् फलदायी योग जुळून येत आहे.

यासोबतच कालपुरुष कुंडलीत भागेश चंद्र आणि लाभेश बुध यांच्यात होणारे राशि परिवर्तन या दिवसाचे महत्त्व आणि शुभता अधिकच वाढवत आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते, या शुभ योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी, 5 विशिष्ट राशींच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा, उत्पन्नात वाढ करणारा आणि नात्यात गोडवा आणणारा ठरणार आहे.

वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र पुष्करांश योग विशेष लाभदायक ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि नोकरीत तुमच्या सर्जनशील विचारांचे कौतुक होईल. व्यवसायात जुने क्लायंट पुन्हा जोडले गेल्याने मोठा आर्थिक फायदा संभवतो. लव्ह लाईफमध्ये गोडवा राहील आणि कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक कमाई आणि नेटवर्किंगच्या दृष्टीने वरदान ठरेल. जुन्या ओळखींमधून नवीन प्रोजेक्ट्स किंवा नोकरीत पदोन्नतीची (Promotion) बातमी मिळू शकते. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील आणि जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. तुळ राशीच्या जातकांच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात हा काळ नवीन रंग भरेल. वरिष्ठांकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते आणि व्यवसायाचा ब्रँड व्हॅल्यू वाढेल. उत्पन्नात चांगली सुधारणा दिसून येईल तसेच वैवाहिक आयुष्यात रोमान्स वाढेल.

मकर राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्या मेहनतीचे फळ देणारा ठरेल. नोकरीत नवीन भूमिका किंवा पदभार मिळण्याचे संकेत आहेत, तर व्यवसायात एखाद्या महिला संपर्क सूत्राकडून मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. उत्पन्नाचा दुसरा मार्ग सुरु झाल्याने आर्थिक बचत मजबूत होईल. मीन राशीच्या जातकांना भावनात्मक आणि आर्थिक अशा दोन्ही आघाड्यांवर मोठा दिलासा मिळेल.

फ्रीलान्स किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना नवीन असाइनमेंट्स मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून किंवा थकित रकमेतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. या काळात गरजूंची मदत करणे आणि प्राण्यांना अन्न-पाणी देणे सर्व राशींसाठी अधिक पुण्यदायी ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT