Shukra Gochar Dainik Gomantak
Horoscope

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Shukra Nakshatra Parivartan Uttara Phalguni: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धन, ऐश्वर्य, सौंदर्य आणि वैवाहिक सुखाचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करत आहे.

Manish Jadhav

Shukra Nakshatra Parivartan Uttara Phalguni: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धन, ऐश्वर्य, सौंदर्य आणि वैवाहिक सुखाचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन करत आहे. शुक्र ग्रहाने पूर्वाफाल्गुनी नक्षत्रातून निघून उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला. ग्रहांच्या या महत्त्वपूर्ण हालचालीचा थेट प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीवर आणि लव्ह लाईफवर पडणार आहे. शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन विशेषतः चार राशींच्या जातकांसाठी मोठ्या आव्हानांचे आणि आर्थिक नुकसानीचे संकेत देत असल्याने, या काळात अत्यंत सावध राहण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिला.

शुक्राच्या या नक्षत्रांतरामुळे सिंह राशीच्या जातकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा ताण अचानक वाढू शकतो, ज्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. तसेच तुमच्या पार्टनरसोबत अनावश्यक कारणांवरुन वाद होण्याची शक्यता असल्याने प्रेमसंबंधात दुरावा येऊ शकतो. दुसरीकडे, कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यापार आणि व्यवसायात आव्हाने घेऊन येईल. आर्थिक व्यवहारात मोठे नुकसान होण्याची टांगती तलवार असेल. कौटुंबिक आणि वैवाहिक नात्यांमध्ये गैरसमज वाढून मतभेद तीव्र होऊ शकतात, ज्यामुळे मन अस्वस्थ राहील.

वृश्चिक राशीच्या जातकांना शुक्राच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी आर्थिक बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी लागेल. या काळात अचानक वाढणारे अवाजवी खर्च तुमचे आर्थिक बजेट पूर्णपणे बिघडवू शकतात. महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ उडेल, त्यामुळे कोणत्याही कामात निष्काळजीपणा करणे महागात पडू शकते. कुटुंबातील सदस्यांशी वाद टाळणे हिताचे ठरेल. मीन राशीच्या लोकांसाठीही हा काळ चढ-उतारांचा राहील. करिअरमध्ये (Career) यश मिळवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त कष्ट करावे लागतील. वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता असून, नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तनात संयम आणि नम्रता ठेवावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

SCROLL FOR NEXT