Rashi Bhavishya 6 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 6 October 2024: या राशीच्या लोकांनी आज रहावे सावध! जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Daily Horoscope 6 October 2024: कामाच्या ठिकाणी लाभ होण्याची आज उत्तम शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

रविवार,६ आक्टोबर २०२४, अश्विन शुक्ल पक्ष,शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- विनायक चतुर्थी

  • रास- वृश्चिक १७l३४ नं.

  • नक्षत्र- विशाखा २४l११

  • योग - प्रीती अहोरात्र

  • करण - गरज ०७l५०

  • दिनविशेष - विशाखा वर्ज्य

आजचे राशिभविष्य

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

  • मेष

दवाखाना होण्याची शक्यता दिसते त्यामुळे दूरचे प्रवास टाळा. व्यर्थ खर्च होऊ शकतो, मनाविरुद्ध घटना घडू शकतील सावधान असावे,साधारण नोकरी ठिकाणी अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता दिसते त्यामुळे आज मौन हेच तुमचे शस्त्र आहे.

  • वृषभ

आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे परंतु प्रतिकार शक्ती असल्याने कोणतेही कार्य अडणार नाही,जे नियमित कार्य आहेत ते निश्चित पूर्ण होईल,काहीतरी नवीन शिकण्यास मिळेल,नोकरीच्या ठिकाणी काही विशेष घटना घडतील.

  • मिथून

आज प्रयत्नाने उत्तम लाभ दिसतो,आपल्या उत्तम वाणीचा चांगल्याप्रकारे उपयोग करून व्यवहार कराल तर व्यवसायात छान नफा होईल, दूरचा प्रवास टाळावा तसेच दुहेरी विचारात मन गोंधळू शकते.

  • कर्क

आज आपल्याला थोडे अधिक काम करावे लागणार, तरीही शारीरिक त्रास होणार नाही याची दक्षता मात्र घ्यावी,नोकरीच्या ठिकाणी विशेष लाभ होईल,शत्रूंपासून सावधान राहावे. आरोग्य सांभाळा

  • सिंह

केलेल्या कार्याचे परिणाम उशिरा मिळेल, संयम ठेवले असता निश्चित लाभ आहे,परंतु घरातील कामे देखील वाढतील, शांतपणे निर्णय घेतले असता सर्व काही व्यवस्थित होईल, चिडचिड होईल अश्या घटना घडण्याची शक्यता आहे.

  • कन्या

शेअर मार्केट इत्यादीतून नुकसान संभवेल त्यामुळे शक्यतो पैसे गुंतवू नका,जवळच्या लोकांकडून मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे गडबडीत कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा.

  • तूळ

नोकर किंवा हाताखाली काम करण्यार्यांपासून सावध राहावे,फसवणुक होण्याची शक्यता आहे,खरेदी तथा विक्री यासंदर्भात देखील सावधानता असावी तसेच आरोग्य सांभाळावे, वातावरणानुसार आजार होऊ शकतो.

  • वृश्चिक

    जोडीदाराकडून काहीतरी फायदा होण्याची शक्यता आहे, कुटुंबातील लोकांसमवेत आनंद साजरा कराल,आरोग्य सांभाळावे हॉस्पिटल खर्च होऊ शकतो.

  • धनु

आज एकटेपणा वाटू शकेल,जवळच्या लोकांशी वादविवाद होण्याची शक्यता दिसते,वाहने सावकाश चालवा,कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित घटना घडतील ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो, शक्यतो अश्या गोष्टींकडे दुर्लक्षच करा.

  • मकर

परिवारासह दूरचा व छान असा प्रवास होईल,उत्तम सांसारिक सुख मिळेल, मातेकडून विशेष मार्गदर्शन मिळेल, देवकार्य तथा कुलदेवता यांची आराधना किंवा यात्रा करण्याचा विचार येईल,अध्यत्मिक कार्ये घडतील.

  • कुंभ

अगदी निवांत कामे होतील,आज शांत मनाने सर्व निर्णय घ्याल,विशेष काहीतरी शिकण्यास मिळेल. वडिलांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल,व्यवसायात तथा नोकरीसंदर्भात योग्य तो लाभ होईल.

  • मीन

मित्रांकडून फसवणुक होण्याची शक्यता आहे सावधानता बाळगल्यास उत्तम. नोकरीच्या ठिकाणी विशेष लाभ होईल,व्यवसाय संदर्भात महत्त्वाकांक्षा कमी पडेल ज्यामुळे नफा थोडा कमी होण्याची संभावना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी रंगणार भारत–पाकिस्तान महामुकाबला! किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Goa Crime: गोव्यात दिवसा चेन स्नॅचिंग… रात्री महाराष्ट्रात पसार! इराणी गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक

Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

राज्यपालपदाच्या प्रवासासाठी राजकीय प्रवासाला सोडचिठ्ठी; पी. अशोक गजपती राजू यांचा तेलगू देसम पक्षाचा राजीनामा

दो भाई दोनों तबाही! मोठ्याने पदार्पणाच्या सामन्यातच विश्वविक्रम रचला, आता धाकट्याने 'हॅटट्रिक' घेत घातला धुमाकूळ; पाहा Video

SCROLL FOR NEXT