Rashi Bhavishya 4 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 4 November 2024: अडकलेले पैसे परत मिळतील, प्रॉपर्टी डील करत असाल तर उत्तम योग; जाणून घ्या 'या' राशीचं भविष्य

Daily Horoscope 25 October 2024: अडकलेला पैसा परत मिळतील. तुम्ही प्रॉपर्टी डील करत असाल तर तुम्हाला त्यात चांगले यश मिळू शकते.

Akshata Chhatre

मेष: तुम्हाला एखाद्या खास नातेवाईक किंवा शेजाऱ्याचे सहकार्य मिळू शकते. पैशाच्या बाबतीत परिस्थिती सामान्य असेल, परंतु खर्चाकडे लक्ष द्या, तसेच तब्येतीकडेही लक्ष द्या. नशिबाची साथ मिळेल.

वृषभ: कामात उत्साह जाणवेल. मित्रांसोबत उत्तम समन्वय राहील आणि त्यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा द्याल. उत्पन्नात वाढ होईल, त्यामुळे तणाव कमी होऊ शकतो. तुमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल. जर तुम्ही विवाहित असाल तर थोडी काळजी घ्या. जोडीदारासोबत खटका उडू शकतो.

कन्या: तुम्हाला तुमच्या कामात आनंद जाणवेल. कामे लवकरात लवकर पूर्ण करुन सहकाऱ्यांशी संवाद साधाल. घरातील वातावरण धार्मिक राहील. रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल कारण त्याचा तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होऊ शकतो.

सिंह: मित्रांसोबत मौजमस्ती कराल. कामाच्या बाबतीत परिस्थिती चांगली राहील. इंटरनेटद्वारे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. प्रेमाने जीवन जगणारे लोक त्यांच्या नात्यात खूप खूश राहतील. तुम्ही तुमच्या प्रियकराशी लग्न करण्याचे तुमचे स्वप्न साकार करण्याबद्दल बोलाल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल.

वृश्चिक: जास्त विचार करु नका. विवाहित लोकांसाठी आनंददायी दिवस असेल. तुमचा जीवनसाथी तुमच्या चेहऱ्यावर हासू आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत संध्याकाळचा वेळ घालवणे तुमचे प्राधान्य असेल.

मिथुन: अडकलेला पैसा परत मिळतील. तुम्ही प्रॉपर्टी डील करत असाल तर तुम्हाला त्यात चांगले यश मिळू शकते. विवाहित लोकांना कौटुंबिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेमीयुगुल एकमेकांशी प्रेमाने बोलतील. कामाच्या बाबतीत परिस्थिती पूर्णपणे तुमच्या अनुकूल असेल, ज्यामुळे चांगले परिणाम जाणवतील.

कर्क: एकटेपणा जाणवेल. धार्मिक कार्यामुळे मानसिक शांतता मिळेल. तुम्ही दिवसाची सुरुवात पूर्ण उत्साहाने कराल. विवाहित लोकांना नवीन कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. तुम्ही तुमच्या मुलांबद्दल थोडे चिंतेत असाल.

तूळ: तूळ राशीचे लोकांना विनाकारण चिंता जाणवेल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमचे विरोधक अडथळा आणतील. तुम्ही तुमच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर विरोधकांना पराभूत कराल.

धनु: धनु राशीच्या लोकांना काही नवीन लोकांच्या ओळखीचा फायदा मिळेल. याशिवाय, भूतकाळाच्या संदर्भातील संशोधनही फायदेशीर ठरु शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याचा दिवस, मात्र यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करु नका. नाहीतर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. व्यावसायिक प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल.

मकर: तुम्ही तुमचा अनुभव आणि कार्यक्षमता जवळपास सर्वच क्षेत्रात दाखवाल. तुमचे उत्पन्नही वाढेल आणि तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल. तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर आज तुमची तयारी पुढे नेईल. विवाहित लोकांना कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या नात्याबद्दल जागरुक राहतील, गैरसमज होणार नाहीत याकडे लक्ष देतील.

कुंभ: धार्मिक कार्यात चांगला खर्चाची शक्यता. तुमचे नशीब बलवान असेल, ज्यामुळे तुम्ही कामात चांगली कामगिरी करु शकाल. तुमचे सहकारी देखील तुम्हाला साथ देतील, परंतु तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे सतर्कता बाळगा. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन तणावपूर्ण राहील.

मीन: विद्यार्थ्यांचे मानसिक आणि बौद्धिक ओझे कमी करण्याचा आजचा दिवस असेल. संध्याकाळी भटकंती करताना तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवन आनंदमय राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दूरच्या प्रवासाला जाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT