Rashi Bhavishya 29 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 29 October 2024: कष्टांचे फळ मिळेल, कोर्ट-कचेरीची कामं मार्गी लागतील; आजच्या दिवशी भरपूर समाधानी असाल

Daily Horoscope 29 October 2024: आजचा दिवस समाधानी होण्याचा

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

मंगळवार,२९ आक्टोबर २०२४,अश्विन कृष्ण पक्ष, शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- द्वादशी १०:३२

  • रास- कन्या

  • नक्षत्र- उत्तराफाल्गुनी १८l३४

  • योग - ऐंद्र ०७l४८

  • करण - तैतील १०l३२

  • सूर्योदय - ०६:३९

  • चंद्रोदय - २८:४२

  • दिनविशेष - ८.प.चांगला दिवस

आजचे राशीभविष्य

मेष - भावंडांशी संपर्क होईल, जवळचे प्रवास होतील.

वृषभ - घरगुती व्यवसायात उत्तम लाभ होईल, जमीन, प्लॉट इत्यादी क्षेत्रातील कामे जलद गतीने होतील, घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील.

मिथून - स्नेही मित्रांची भेट होईल, प्रेमासाठी केलेले प्रयत्ने फलदायी ठरतील,संततीसुख मिळेल, भागीदारीत विशेष फायदा होईल.

कर्क - आरोग्य समस्या जाणवतील, प्रतिकार शक्ती कमी होईल, नातेवाईकांकडून मानसिक त्रास संभवेल.

सिंह - भागीदारीत उत्तम लाभ मिळेल, कोर्ट-कचेरीच्या त्रासातून सुटका होईल अथवा त्यामधून उत्तम मार्ग मिळेल.

कन्या - गेलेले पैसे अर्थात मिळण्याची शक्यता आहे, तसेच घेतलेले कर्ज इत्यादी फिटण्यास मदत होईल, नातेवाईकांकडून मदत मिळेल,परंतु काही काळ एकटेपणा देखील जाणवेल. अधिक विचारात राहू नका.

तूळ - प्रवास होईल परंतु तो थोडा त्रासदायक ठरेल, थकवा जाणवेल,अशक्तपणा किंवा अस्वस्थपणा जाणवेल, उत्तम स्थीतीसाठी नियमित व्यायाम तथा ध्यान धारणा करावी.

वृश्चिक - व्यवसायातील वस्तूंना भाव मिळेल, लाभ होईल, सुगंधी वस्तूंचा व्यवसाय असता छान भरभराट होईल.

धनु - कष्ट केल्याचे फळ मिळण्याचा काळ आहे, ओळखीचे लोक भेटतील,संतती सौख्य मिळेल, मार्केट सारख्या क्षेत्रात यश लाभेल.

मकर - जोडीदारासह वादविवाद होण्याची शक्यता आहे, थोडक्यात गैरसमज होऊ शकतो, एकांत हवा हवासा वाटेल, मानसिक स्थिती सांभाळावी, इष्ट देवतेचे चिंतन करावे.

कुंभ - संशयात्मक विचार येतील,कामे पूर्ण होतील परंतु लाभ थोडा उशिरा मिळेल आणि उत्तम मिळेल,पती /पत्नीतील मनमुटाव दूर होईल,आरोग्य सांभाळावे.

मीन - कुटूंबातील लोकांच्या कुरबुरी असतील,मानसिक स्थिती बिघडेल,अशा त्रासांकडे दुर्लक्ष केले तरच ते कमी होतात,काही काळ मौन राहावे, महत्वाकांक्षा कमी होऊ देऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

SCROLL FOR NEXT