Rashi Bhavishya Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 22 October 2024: 'या' राशीच्या लोकांना प्रेमात मिळणार यश; काय सांगतयं आजचं राशीभविष्य

Daily Horoscope 22 October 2024: आजचा दिवस यश संपादन करण्याचा

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

मंगळवार,२२ आक्टोबर २०२४,अश्विन कृष्ण पक्ष, शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- षष्ठी २५l२८

  • रास- मिथून

  • नक्षत्र- आर्द्रा २९l३७

  • योग - परिघ ०८l४४

  • करण - गरज १३l५२

  • दिनविशेष - चांगला दिवस

आजचे राशीभविष्य

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

मेष - कामासंदर्भात किंवा कामाच्या ठिकाणी चिडचिड होईल अशा काही घटना घडण्याची शक्यता आहे, लाभ तर होईल पण तो अधिक काळ टिकणारा लाभ असेल असे वाटत नाही.

वृषभ - भाग्योदय होणार आहे, पण हा लाभ आपण आपल्या कर्मानुसार टिकवणार आहात. उच्च शिक्षणात उत्तम प्रगती लाभणार आहे.

मिथून - व्यवसायात उत्तम भरभराट होईल,इच्छा पूर्ण होतील,परंतु तेवढाच खर्च देखील होईल याची दक्षता घ्यावी.

कर्क - केवळ अधिक प्रयत्नानेच कार्ये पूर्ण होतील व त्यातून लाभ मिळेल,आपल्या नाजूक मनाचा या काळात कोणीही फायदा घेऊन फसवू शकतो त्यामुळे सावध राहा.

सिंह- आपण अनेक प्रयत्ने करून देखील अपेक्षित धनलाभ होत नाही अशा प्रकारे विचार मनात येत आहेत, त्यामुळे आपला किती खर्च होतो त्याकडे प्रथम लक्ष द्या.

कन्या - घरातली कामांकडे लक्ष द्या अन्यथा घरातील लोक तुमच्यावर नाराज राहतील, अधिक आळशीपणा निर्माण होऊ शकतो.

तूळ - संतती सुख मिळेल, शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रात पैसे गुंतवू नका नुकसान होण्याची शक्यता आहे, खर्च अधिक होईल. काळजी नसावी तेवढाच लाभ देखील होईल,तसेच आपल्यावरील जबाबदारी वाढेल.

वृश्चिक - सर्व कार्ये नियमीत होतील परंतु त्याचा लाभ मिळणार नाही किंवा कमी प्रमाणात मिळेल

धनु - घरगुती कामे किंवा घरगुती व्यवसायात उत्तम लाभ होईल.

मकर - प्रेमात यश मिळेल,अभ्यासात विशेष प्रगती साधाल, व्यवसायातील कार्यात मदत मिळेल, संततीसुख मिळेल, कामाच्या ठिकाणी विशेष लाभ होईल, वाहने सावकाश चालवीत.

कुंभ - आजारावर औषधी काम करतील, प्रतिकार शक्ती वाढेल, प्रसन्नता जाणवेल.

मीन - मनात असलेल्या गोष्टी आपल्या जोडीदाराकडे व्यक्त करा, काही गोष्टी बोलल्याशिवाय विषय लक्षात येत नाहीत. पार्टनरशिपमध्ये पैसे गुंतवू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Session: विरोधकांत एकीचा अभाव, सत्ताधाऱ्यांनी घेतली मात्र अधिवेशनपूर्व महत्वाची बैठक; बंद दाराआड चर्चा

Goa AI Center: 'गोव्यात एआय केंद्र स्थापन करणार; 240 सरकारी सेवा थेट व्हॉट्सॲप चॅटबॉटवर मिळणार' मुख्यमंत्र्यांची माहिती

Goa Live News: मी बैठकीत नाही, पण जेवणासाठी सहभागी झालो : सभापती तवडकर...

IND Vs ENG 4th Test: मँचेस्टरचा 'जो रुट' फॅक्टर! चौथ्या कसोटीत काय असणार भारताची रणनीती? जाणून घ्या आकडेवारी

IND vs ENG: गिलसेनेचं टेन्शन वाढलं! इंग्लंडचा संघ झाला सुपर स्ट्रॉंग, जोफ्रानंतर आता 'या' धाकड गोलंदाजाचं संघात पुनरागमन

SCROLL FOR NEXT