Grah Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

Rare Astrological Yoga April 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एप्रिल महिन्याची सुरुवात अत्यंत शुभ आणि सकारात्मक घडामोडींनी झाली.

Manish Jadhav

Rare Astrological Yoga April 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एप्रिल महिन्याची सुरुवात अत्यंत शुभ आणि सकारात्मक घडामोडींनी झाली. द्रिक पंचांगानुसार, बुधवार 1 एप्रिल 2026 रोजी आकाशात शुक्र, वरुण आणि बुध या तीन प्रमुख ग्रहांच्या प्रभावामुळे अत्यंत दुर्मिळ आणि शुभ कोणीय योगांची निर्मिती झाली. दुपारी 4:47 वाजता शुक्र आणि वरुण एकमेकांपासून 30 अंशांच्या अंतरावर आल्याने 'द्विद्वादश योग' तयार झाला, तर संध्याकाळी वरुण आणि बुध 18 अंशांच्या कोणीय अंतरावर आल्याने 'अष्टादश योग' निर्माण झाला.

ज्योतिषाचार्य हर्षवर्द्धन शांडिल्य यांच्या मते, हे दोन्ही योग मानवी जीवनात अचानक धनलाभ आणि शुभ संधी घेऊन येणारे मानले जातात. या ग्रहांच्या स्थितीचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव पाच राशींवर पडणार असून त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळासारखा ठरणार आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ संपत्ती आणि आर्थिक बाबींसाठी अत्यंत अनुकूल आहे. जर तुम्ही घर, जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या मदतीने तुमच्या रखडलेल्या योजना यशस्वी होतील. जुन्या वादांतून सुटका मिळण्याची दाट शक्यता असून प्रवासातून लाभ मिळण्याचे योग आहेत.

सिंह राशीच्या जातकांसाठी हे ग्रहांचे संक्रमण उत्साहाचे वातावरण घेऊन आले. व्यापार असो वा नोकरी, तुम्हाला नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होण्यासोबतच घरातील वातावरण आनंदी राहील आणि नवीन मित्र-मैत्रिणींच्या संपर्कामुळे भविष्यात मोठे फायदे होतील. विशेषतः तरुण वर्गाकडून सुखद बातम्या मिळतील, ज्यामुळे तुमची मानसिक प्रसन्नता वाढेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये या काळात कमालीचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता पाहायला मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावले टाकल्यास मोठे लाभ मिळण्याचे संकेत आहेत. शिक्षणाशी (Education) संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठे यश मिळेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी तर हा काळ अचानक धनप्राप्तीचा आणि आनंदाचा संदेश घेऊन आला आहे. व्यावसायिक सौद्यांमध्ये तुम्हाला अनपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. नवीन ओळखी तुमच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करतील, फक्त आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरुन तुम्ही या संधींचा पूर्ण आनंद घेऊ शकाल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आध्यात्मिक आणि रचनात्मक कामात तुमची गोडी वाढेल, ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरीने घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यात मोठा परतावा देऊ शकतात. कुटुंबात संवाद वाढवल्यामुळे जुने मतभेद दूर होऊन सुखाचे अनुभव येतील. एकूणच, 1 एप्रिल रोजी तयार झालेले हे शुभ योग या पाच राशींच्या जीवनात सकारात्मक बदलांची मोठी लाट घेऊन आले आहेत, ज्याचा फायदा त्यांना दीर्घकाळापर्यंत मिळत राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

Europe Heatwave: युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर! फ्रान्समध्ये 1000 हून अधिक मृत्यू; 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे परिस्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT