Rahu transit 2026 effects on zodiac signs Dainik Gomantak
Horoscope

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Rahu Transit Capricorn 2026 Predictions: ज्योतिषशास्त्रात मकर राशीला अधिकार, कर्म आणि अथक संघर्षानंतर मिळणाऱ्या शाश्वत यशाचे प्रतीक मानले जाते, कारण या राशीचा स्वामी न्यायदेवता शनि आहे.

Manish Jadhav

Rahu Transit Capricorn 2026 Predictions: ज्योतिषशास्त्रात मकर राशीला अधिकार, कर्म आणि अथक संघर्षानंतर मिळणाऱ्या शाश्वत यशाचे प्रतीक मानले जाते, कारण या राशीचा स्वामी न्यायदेवता शनि आहे. शनिच्या प्रभावामुळे मिळणारे यश जरी संथ गतीने मिळत असले तरी ते कायमस्वरुपी टिकणारे असते.

मात्र, जेव्हा मायावी आणि छाया ग्रह राहु या राशीत प्रवेश करतो, तेव्हा व्यक्तीला अनपेक्षित आणि अफाट यश प्राप्त होते. दृक पंचांगानुसार, येत्या 25 नोव्हेंबर रोजी राहु कुंभ राशीतून बाहेर पडून मकर राशीत स्पष्ट गोचर करणार आहे.

राहुचा हा प्रवास जून 2028 पर्यंत याच राशीत कायम राहील. या महत्त्वपूर्ण ग्रहाच्या बदलामुळे मुख्यत्वे पाच राशींच्या जातकांना अचानक मोठा धनलाभ आणि राजयोगासारखे फळ मिळण्याचे प्रबळ योग बनत आहेत.

मेष राशीच्या जातकांसाठी राहुचे हे गोचर अत्यंत फलदायी ठरणार असून त्यांच्या प्रत्येक कामाला अचानक कमालीची गती मिळेल. वर्षांनुवर्षे रखडलेली कामे मार्गी लागतील आणि कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभून मनसोक्त पदोन्नती व बदलीचे योग जुळून येतील.

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ जुन्या कर्जातून मुक्तता मिळवून देणारा ठरेल. तुमचे गुप्त शत्रू निष्प्रभ ठरतील आणि न्यायालयात सुरु असलेले जमिनीचे वाद मिटून मोठा आर्थिक फायदा होईल.

तुळ राशीच्या जातकांच्या सुख-समृद्धी आणि भौतिक साधनांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. कौटुंबिक संपत्तीचे प्रश्न सुटतील आणि नवीन घर अथवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच शेअर बाजारातील जुनी गुंतवणूक मोठे रिटर्न्स देईल.

स्वतः मकर राशीतच राहुचे आगमन होत असल्याने मकर राशीच्या जातकांसाठी हा खऱ्या अर्थाने गोल्डन टाईम सिद्ध होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेच आकर्षण निर्माण होईल, ज्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठे पद आणि मानसन्मान प्राप्त होईल.

मीन राशीसाठी राहुचे हे भ्रमण उत्पन्नाचे (Income) एकापेक्षा जास्त नवीन स्रोत निर्माण करणारे ठरेल. मित्रांच्या आणि भावांच्या सहकार्यामुळे तुमचा व्यवसाय एका नव्या उच्चांकावर पोहोचेल. गुंतवणुकीतून अचानक होणारी धनवर्षा मीन राशीच्या जातकांना आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत करेल. एकंदरीत, राहुचे हे 18 महिन्यांचे गोचर या पाच राशींच्या आयुष्याला नवी दिशा देऊन त्यांना धनधान्याने समृद्ध करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT