Rahu Ketu Transit December 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, लवकरच राहू मकर राशीत आणि केतू कर्क राशीत प्रवेश करणार असून डिसेंबर महिन्यापासून अनेक राशींच्या जातकांसाठी एका अत्यंत शुभ आणि चांगल्या वेळेची सुरुवात होणार आहे. ग्रहांच्या या महत्त्वपूर्ण चालीमुळे मेष, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन या सहा राशींच्या नशिबाला नवी दिशा मिळणार असून, या काळात त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
मेष राशीच्या लोकांसाठी राहू-केतूचे हे गोचर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत नवी शिखरे सर करता येतील आणि व्यवसायात मोठी डील फायनल होऊन मोठा नफा मिळण्याचे योग जुळून येत आहेत. मिथुन राशीच्या जातकांसाठी देखील हा काळ सोन्याहून पिवळा असणार आहे. नोकरदार वर्ग असो किंवा व्यावसायिक, दोघांनाही आर्थिक लाभ, पगारवाढ आणि पदोन्नतीची गोड बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच विदेशातून किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकते.
मागील काही काळापासून मानसिक तणाव, चिंता आणि संकटांचा सामना करत असलेल्या कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठा दिलासा घेऊन येत आहे. तुमचे रखडलेले निर्णय मार्गी लागतील, मन शांत राहील आणि करिअरमध्ये वेगाने पुढे जाण्याची उत्तम संधी तुम्हाला प्राप्त होईल. कन्या राशीच्या जातकांच्या संपत्ती आणि उत्पन्नात (Income) भरघोस वाढ होण्याचे योग आहेत. कामाचा वेग वाढल्यामुळे नोकरीत बढती मिळण्याची शक्यता बळावेल.
याशिवाय वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची भक्कम साथ मिळणार असून, केलेली गुंतवणूक भविष्यात भरघोस परतावा देणारी ठरेल. मीन राशीच्या लोकांचा मान-सन्मान समाजात वाढेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि या काळात धार्मिक कार्यात सहभाग किंवा लांबच्या प्रवासाचे योग जुळून येतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.