Horoscope Dainik Gomantak
Horoscope

2026 Lucky Zodiac Sign: शुक्र-बुधाची जादू तर सूर्य-मंगळाचा धडाका! जानेवारी महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; 2026 ची सुरुवात ठरणार सुवर्णकाळ

Lucky Zodiac Sign: 21 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक असलेला 'शुक्र' ग्रह श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल.

Manish Jadhav

2026 Lucky Zodiac Sign: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जानेवारी 2026 हा महिना अत्यंत विशेष आणि बदलांचा ठरणार आहे. या महिन्याच्या उत्तरार्धात एकाच नक्षत्रात चार प्रमुख ग्रहांचे गोचर होणार असून या खगोलीय घटनेचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार असला तरी तीन भाग्यवान राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा ठरणार आहे.

पंचांगानुसार, 21 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक असलेला 'शुक्र' ग्रह श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल. यानंतर लगेचच 23 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा 'बुध' देखील याच नक्षत्रात दाखल होईल. ग्रहांच्या या हालचाली येथेच थांबणार नाहीत, तर 24 जानेवारीला सकाळी 11 वाजता ग्रहांचा राजा 'सूर्य' श्रवण नक्षत्रात गोचर करेल आणि शेवटी 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता ग्रहांचा सेनापती 'मंगळ' देखील याच नक्षत्रात प्रवेश करेल. अशाप्रकारे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात श्रवण नक्षत्रात ग्रहांची एक शक्तिशाली युती पाहायला मिळेल.

दरम्यान, या महत्त्वपूर्ण बदलांमुळे मेष राशीच्या व्यक्तींसाठी नव्या वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक आणि नव्या संकल्पांना पूर्ण करणारी ठरेल. मेष राशीचे लोक जे काही नवीन संकल्प करतील, ते वेळेत पूर्ण करण्यात त्यांना यश मिळेल. जे लोक नोकरी किंवा व्यवसायात आहेत, त्यांना एखाद्या फायदेशीर योजनेत गुंतवणूक (Investment) करण्याची मोठी संधी मिळेल, ज्याचा लाभ त्यांना दीर्घकाळापर्यंत मिळत राहील.

तसेच, वैवाहिक आयुष्यात जोडीदाराला दिलेला कोणताही शब्द किंवा वचन तुम्ही या काळात पूर्ण करु शकाल, ज्यामुळे नाते अधिक घट्ट होईल. तरुणांसाठी हा काळ प्रवासाचा योग घेऊन येत असून मित्रांसोबत केलेली लांब पल्ल्याची सहल आनंददायी ठरेल. ध्येयप्राप्तीसाठी तुम्ही जे काही कष्ट घेतले आहेत, त्याचे गोड फळ मिळण्याची हीच वेळ आहे.

तूळ राशीच्या जातकांसाठी हे ग्रहांचे गोचर मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणार आहे. या काळात विवाहित व्यक्तींनी आपल्या वाणीवर थोडे नियंत्रण ठेवल्यास त्यांच्या नात्यातील कडूवटपणा दूर होऊन प्रेमात वृद्धी होईल. आर्थिक बाजू मजबूत होणार असल्यामुळे नोकरीपेशा आणि व्यावसायिक लोकांचा मानसिक ताण कमालीचा कमी होईल.

विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः महत्त्वाचा आहे; उच्च शिक्षणासाठी (Education) परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्ग आता मोकळा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि मित्रांचे सहकार्य लाभल्यामुळे रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. विशेष म्हणजे, या काळात तुमची बचत वाढण्याची दाट शक्यता असून भविष्यासाठी मोठी पुंजी जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ संघर्षाकडून यशाकडे नेणारा ठरेल. दीर्घकाळापासून कष्टाचा सामना करणाऱ्या तरुणांना अखेर त्यांचे नियोजित ध्येय साध्य होईल. व्यवसायात निर्माण होणारे नवीन संपर्क तुमच्या भाग्योदयासाठी कारणीभूत ठरतील, ज्यामुळे व्यापारात मोठी प्रगती दिसून येईल. कौटुंबिक आघाडीवर आनंदाचे वातावरण राहील; जीवनसाथी आणि घरातील इतर सदस्यांसोबत होणारे वैचारिक मतभेद आता संपुष्टात येतील आणि नात्यात गोडवा निर्माण होईल. जर तुमचा मालमत्तेशी संबंधित एखादा खटला न्यायालयात प्रलंबित असेल, तर या काळात निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत, जानेवारी अखेरची ही ग्रहांची युती कुंभ राशीसाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारी ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT