rajyog October astrology Dainik Gomantak
Horoscope

Rajyog Astrology: ऑक्टोबरमध्ये नशिबाची मोठी लॉटरी! तीन मोठे राजयोग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा

Rajyog Astrology Prediction October: ग्रहांच्या गोचरामुळे अनेक दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे काही राशींच्या नशिबाची दारं उघडू शकतात

Akshata Chhatre

October horoscope money gain: ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. या महिन्यात ५ मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. या ग्रहांच्या गोचरामुळे अनेक दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे काही राशींच्या नशिबाची दारं उघडू शकतात.

या महिन्यात होणारे महत्त्वाचे ग्रह बदल पुढीलप्रमाणे आहेत: सर्वात आधी बुध ग्रह आपली रास बदलेल. शनी ३ ऑक्टोबर रोजी नक्षत्र परिवर्तन करेल, ज्यामुळे बुध तुला राशीत प्रवेश करेल. ९ ऑक्टोबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. १७ ऑक्टोबरला सूर्य तुला राशीत प्रवेश करेल, तर, १८ ऑक्टोबरला गुरु कर्क राशीत गोचर करेल. या ग्रह गोचरांमुळे नवपंचम, मालव्य आणि रुचक यांसारखे शुभ राजयोग तयार होतील. या बदलांचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप शुभ ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्याही हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे, त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा, कारण धनलाभाची दाट शक्यता आहे. कुटुंबातील नातेसंबंध अधिक चांगले होतील आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता असली, तरी ग्रहांच्या बदलामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात तुमची समृद्धी वाढू शकते आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही जे काही गमावले होते, ते परत मिळण्याची शक्यता आहे. हे परिवर्तन तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT