Budh Gochar  Dainik Gomantak
Horoscope

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Budh Gochar Hasta Nakshatra Astrology Benefits: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह सध्या हस्त नक्षत्रात विराजमान असून तो 21 सप्टेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहील.

Manish Jadhav

Budh Gochar Hasta Nakshatra Astrology Benefits: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह सध्या हस्त नक्षत्रात विराजमान असून तो 21 सप्टेंबरपर्यंत याच नक्षत्रात राहील. यानंतर बुध ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुधाच्या या महत्त्वाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 12 राशींपैकी 5 भाग्यशाली राशींचे नशीब पूर्णपणे उजळणार आहे. या काळात ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे अडकलेली कामे मार्गी लागतील, व्यापारात मोठा धनलाभ होईल आणि करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरेल. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे नवे योग जुळून येतील, तसेच जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित मोठा परतावा मिळून आर्थिक घडी बळकट होईल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र भ्रमण अत्यंत शुभ मानले जात आहे. या काळात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे करिअरमध्ये (Career) उच्च पद किंवा नवी संधी मिळू शकते. बुधाच्या सकारात्मक प्रभावामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळेल, तर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळवून देणारा ठरेल.

सिंह राशीच्या जातकांना या काळात आर्थिक आघाडीवर मोठे यश मिळेल. भाग्याची उत्तम साथ लाभल्यामुळे हाती घेतलेले प्रत्येक काम फत्ते होईल. कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी प्रवासाचे योग येतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. व्यवसायातील नफ्यासह तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळेल. कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हस्त नक्षत्रातील स्थान वरदान ठरेल. अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील आणि व्यापाऱ्यांना एखादी मोठी व्यावसायिक डील मिळून प्रचंड आर्थिक फायदा होईल. या काळात कौटुंबिक जीवनात आनंद, शांतता आणि सुसंवाद टिकून राहील.

मीन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे भ्रमण करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी घेऊन येत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना अत्यंत आनंदाची बातमी मिळू शकते. तर कार्यरत कर्मचाऱ्यांना कार्यस्थळावर नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळून पदोन्नतीचे योग निर्माण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT