Budh Nakshtra Gochar Dainik Gomantak
Horoscope

Budh Nakshtra Gochar 2026: व्यापारात दुप्पट नफा अन् नोकरीत मान-सन्मान! बुधाच्या गोचरने 'या' राशींचे चमकणार नशीब; पैशांनी भरणार तिजोरी

Budh Nakshatra Gochar 2026 Astrology: वैदिक ज्योतिषात बुध हा अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. मानवी मनाची एकाग्रता, बुद्धिमत्ता, वाणी, विवेक आणि व्यापारावर बुधाचे थेट नियंत्रण असते.

Manish Jadhav

Budh Nakshatra Gochar 2026 Astrology: वैदिक ज्योतिषात बुध हा अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाचा ग्रह मानला जातो. मानवी मनाची एकाग्रता, बुद्धिमत्ता, वाणी, विवेक आणि व्यापारावर बुधाचे थेट नियंत्रण असते. त्यामुळे बुधाच्या चालीतील कोणताही बदल सर्व 12 राशींच्या आयुष्यावर परिणाम करतो. 'द्रिक पंचांग'नुसार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 47 मिनिटांनी बुध ग्रह हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रातील प्रवेशामुळे लोकांच्या निर्णयक्षमतेत स्पष्टता येईल, कला आणि कौशल्याला वाव मिळेल आणि व्यापार-करिअरमध्ये आर्थिक उन्नतीचे नवे मार्ग मोकळे होतील.

बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन सर्व राशींसाठी महत्त्वाचे असले, तरी तीन विशेष राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आणि प्रगतीचा ठरणार आहे. पहिली सुदैवी रास म्हणजे मिथुन. मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध असल्याने या नक्षत्र परिवर्तनाचा थेट आणि सकारात्मक प्रभाव मिथुन राशीवर दिसून येईल. विशेषतः मीडिया, मार्केटिंग, सेल्स, ट्रेडिंग आणि फ्रीलांसिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रचंड यश मिळेल. तुमची क्रिएटिव्हिटी नव्या शिखरावर पोहोचेल आणि व्यवसायात मोठ्या आर्थिक डील्स यशस्वी होतील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता असून, नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक आयुष्यात माता-पित्यांचे आशीर्वाद आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभल्याने मन प्रसन्न राहील.

दुसरी भाग्यशाली रास म्हणजे कन्या. सध्या बुध याच राशीत विराजमान असल्याने हस्त नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ घेऊन येईल. तुमच्या बोलण्यातील प्रभाव वाढेल आणि कार्यक्षेत्रात तुमच्या विचारांना विशेष मान दिला जाईल. शेअर बाजार (Stock Market) आणि कमिशनच्या कामात असलेल्या जातकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला नवीन योजनांमधून बंपर नफा मिळेल. तसेच, कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक किंवा आनंददायी सहलीचे योग जुळून येत आहेत.

दुसरी भाग्यशाली रास म्हणजे कन्या. सध्या बुध याच राशीत विराजमान असल्याने हस्त नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ घेऊन येईल. तुमच्या बोलण्यातील प्रभाव वाढेल आणि कार्यक्षेत्रात तुमच्या विचारांना विशेष मान दिला जाईल. शेअर बाजार आणि कमिशनच्या कामात असलेल्या जातकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला नवीन योजनांमधून बंपर नफा मिळेल. तसेच, कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक किंवा आनंददायी सहलीचे योग जुळून येत आहेत.

तिसरी सुदैवी रास म्हणजे मीन. मीन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर आर्थिकदृष्ट्या प्रचंड फायदेशीर ठरेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा धनलाभ होईल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम सिद्ध होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण झाल्याने राहणीमानात सकारात्मक सुधारणा होईल. जोडीदार आणि सासरच्या मंडळींसोबत असलेले जुने मतभेद संपुष्टात येऊन नात्यात गोडवा निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे मन शांत आणि केंद्रित राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NRI Property Rights India: परदेशात राहणाऱ्या मुलींना भारतात वडिलांची शेतजमीन वारसाहक्काने मिळते का? वाचा काय सांगतो कायदा

GST Reforms From 1 November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार GST चे नियम! नोंदणी होणार सोपी, रिफंड मिळणार फास्ट; मोदी सरकारची व्यापाऱ्यांना दिवाळी भेट

Bomb Threat News: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT