Labh Drishti Yoga 2026 
Horoscope

Labh Drishti Yoga 2026: पैसा, प्रतिष्ठा आणि प्रेम! लाभ दृष्टी योगाचा 5 राशींवर मोठा प्रभाव; आत्मविश्वास वाढणार, नवीन व्यवसाय बहरणार

Labh Drishti Yoga Benefits 13 May: आज सकाळी 10 वाजून 11 मिनिटांनी बुध आणि गुरु यांनी एकमेकांपासून 60 अंशांच्या अंतरावर राहून ज्योतिष शास्त्रानुसार अत्यंत फलदायी मानला जाणारा 'लाभ दृष्टी योग' निर्माण केला.

Manish Jadhav

Mercury Jupiter Sextile Yoga 2026: आज (13 मे 2026) अंतराळात एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ खगोलीय घटना घडली. आज सकाळी 10 वाजून 11 मिनिटांनी बुध आणि गुरु यांनी एकमेकांपासून 60 अंशांच्या अंतरावर राहून ज्योतिष शास्त्रानुसार अत्यंत फलदायी मानला जाणारा 'लाभ दृष्टी योग' निर्माण केला. या योगाचा प्रभाव पाच विशिष्ट राशींच्या जातकांसाठी वरदान ठरणार असून, त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. विशेषतः आर्थिक आघाडीवर आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ या राशींसाठी सुवर्णकाळ ठरेल असे संकेत मिळत आहेत.

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा लाभ दृष्टी योग अत्यंत शुभकारी ठरणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे तुमच्या भौतिक सुख-सोयींमध्ये वाढ होईल. जे तरुण लग्नाचे वय झाले आहे आणि योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांना या काळात विवाहाचे (Marriage) चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळवून देणारा आहे. तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. गुंतवणुकीसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल असून, भविष्यात त्यातून मोठा नफा मिळू शकतो. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची विशेष प्रशंसा केली जाईल, ज्यामुळे तुमच्या पदोन्नतीचा (Promotion) मार्ग मोकळा होऊ शकतो.

कन्या राशीच्या जातकांसाठी हा योग आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्हाला या काळात वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पूर्वी कुठे गुंतवणूक केली असेल, तर त्यातून आता चांगला धनलाभ होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होईल.

धनु राशीच्या लोकांच्या जीवनात या योगामुळे अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तुमचे कौटुंबिक जीवन पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि सुखद होईल. नात्यांमधील जुना कडवटपणा दूर होऊन प्रेम वाढेल. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम असून, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश आणि फायदा मिळण्याचे योग आहेत. मीन राशीसाठी बुध-गुरुचा हा लाभ दृष्टी योग आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. तुमच्या मनातील भीती दूर होईल आणि तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने नवीन कामाची सुरुवात करू शकाल. नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल, ज्यामुळे तुमची एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT