Budh Guru Yuti 2026 Dainik Gomantak
Horoscope

Budh Guru Yuti 2026: 15 ऑगस्टला घडणार महासंयोग! 'या' 5 भाग्यवान राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; होणार तगडा धनलाभ

Budh Guru Yuti Benefits 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या शनिवारी (15 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजून 51 मिनिटांनी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ ग्रहांची स्थिती निर्माण होणार आहे.

Manish Jadhav

Budh Guru Yuti Benefits 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या शनिवारी (15 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजून 51 मिनिटांनी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ ग्रहांची स्थिती निर्माण होणार आहे. यावेळी बुध आणि गुरु ग्रह 0 अंशावर एकत्र येत असल्याने एक विशेष युती दृष्टी योग तयार होत आहे. कर्क राशीमध्ये घडून येणारी ही बुध-गुरु युती अनेक राशींच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरेल.

ज्योतिषशास्त्रात बुधाला बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक मानले जाते, तर गुरु ग्रहाला ज्ञान, शिक्षण आणि सौख्याचा कारक मानले जाते. या दोन अत्यंत महत्त्वाच्या ग्रहांचे मिलन वृषभ, सिंह, धनु, मकर आणि मीन या पाच राशींसाठी अत्यंत फलदायी आणि भाग्यकारक ठरणार आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा युती योग करिअरच्या दृष्टीने सुवर्णकाळ ठरेल. नोकरी करणाऱ्या जातकांना धनलाभाचे उत्तम योग आहेत, परंतु मिळालेल्या पैशांची बचत करणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात त्यांचे कौटुंबिक जीवन अतिशय आनंदी आणि सुखमय राहील. दुसरीकडे, सिंह राशीच्या व्यक्तींना या शुभ संयोगामुळे नशिबाची भक्कम साथ लाभणार आहे. समाजात त्यांचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक आघाडीवर मोठा फायदा होण्याची शक्यता असून, या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात उत्तम परतावा देऊन जाईल.

धनु राशीच्या जातकांसाठी ही युती आयुष्यात सकारात्मकतेची नवी पहाट घेऊन येईल. विशेषतः त्यांच्या प्रेमसंबंधांसाठी हा काळ अतिशय रोमँटिक आणि अनुकूल राहील. तसेच कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. मकर राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, हा काळ त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देणारा ठरेल. जे लोक स्वतःचा व्यवसाय किंवा व्यापार करत आहेत, त्यांना एखादी मोठी फायदेशीर डील मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात (Income) घसघशीत वाढ होईल.

शेवटची आणि पाचवी भाग्यवान रास म्हणजे मीन. या राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच करिअरमध्ये अभूतपूर्व यश मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण झाल्यामुळे आणि आर्थिक स्थिती बळकट झाल्यामुळे त्यांचे मन अत्यंत प्रसन्न राहील. एकंदरीत, बदलत्या ग्रहमानामुळे या पाचही राशींच्या जीवनात आनंदाचे आगमन होणार असून, त्यांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

Under 23 Cricket: पहिल्या डावात आघाडी, तरीही गोव्याचा पराभव; ओडिशाने 125 धावांनी दिला धक्का

SCROLL FOR NEXT