Mercury Transit 2026 Dainik Gomantak
Horoscope

Mercury Transit 2026: बुधाचा 'साऊथ टर्न'! 25 मार्चपासून 'या' राशींचे आयुष्य पालटणार, धनलाभासोबतच समाजात वाढणार मान-सन्मान; 'नेम-फेम'चा सुवर्णकाळ सुरु

Astrology Predictions: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नऊ ग्रहांच्या मंत्रिमंडळात बुधाला 'राजकुमार' ही पदवी बहाल करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Astrology Predictions: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नऊ ग्रहांच्या मंत्रिमंडळात बुधाला 'राजकुमार' ही पदवी बहाल करण्यात आली आहे. हा ग्रह प्रामुख्याने मानवाची बुद्धी, वाणी, विवेक, व्यापार, गणित, मनोरंजन आणि संवाद कौशल्याचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध बलवान असतो, त्यांची तर्कशक्ती अफाट असते आणि त्यांची त्वचाही तजेलदार असते.

खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर चंद्रानंतर बुध हा सर्वात वेगवान ग्रह आहे, म्हणूनच त्याला 'क्षिप्रगामी' असे संबोधले जाते. हा ग्रह केवळ वेगाने राशी आणि नक्षत्र बदलत नाही, तर सूर्याच्या परिक्रमा पथावर आपली दिशा देखील बदलत असतो. पंचांगानुसार, येत्या 25 मार्च 2026 रोजी बुध ग्रह दक्षिण दिशेला वळणार आहे. बुधाच्या या दिशा परिवर्तनाचा मानवी जीवनावर, विशेषतः व्यापार, शिक्षण आणि निर्णयक्षमतेवर मोठा प्रभाव पडणार आहे.

ज्योतिषांच्या मते, बुधाची ही बदललेली चाल व्यक्तीमध्ये स्पष्ट विचार करण्याची प्रवृत्ती विकसित करेल. जे लोक लेखन, वाचन किंवा नवीन योजनांवर काम करत आहेत, त्यांना या काळात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हे परिवर्तन नवीन संधींची द्वारे उघडणारे ठरेल. विशेषतः मेष, मिथुन आणि कन्या या तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरणार आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी 25 मार्चपासूनचा काळ अत्यंत सकारात्मक निकालांचा असेल. या काळात तुमची विचारसरणी अधिक स्पष्ट आणि व्यावहारिक होईल, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेऊ शकाल. विशेषतः माध्यम, शिक्षण किंवा संवाद क्षेत्राशी संबंधित असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींना समाजात मोठी ओळख आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुमचे जुने रखडलेले प्रोजेक्ट आता गती घेतील आणि तुमच्या वाणीचा प्रभाव इतरांवर पडल्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रशंसा मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ प्रगतीचा असून मानसन्मानासोबतच धनलाभाचे प्रबळ योग जुळून येत आहेत.

मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध असल्याने या राशीच्या व्यक्तींवर या दिशा परिवर्तनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येईल. मिथुन राशीच्या लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि कमालीचा आत्मविश्वास संचारेल. जे विद्यार्थी (Student) स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ एकाग्रता वाढवणारा ठरेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही व्यापारात नवीन संपर्क प्रस्थापित कराल, जे भविष्यात मोठ्या आर्थिक फायद्यासाठी कारणीभूत ठरतील. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील आणि तुमची समाजात एक हुशार आणि जाणकार व्यक्ती म्हणून प्रतिमा तयार होईल. धनलाभाचे नवीन स्त्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल.

कन्या राशीवर देखील बुधाचे विशेष अधिपत्य असते, त्यामुळे 25 मार्चनंतरचा काळ या राशीसाठी सर्वार्थाने अनुकूल असेल. तुमच्याकडे नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची क्षमता वाढल्यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. विशेषतः संशोधन, विश्लेषण आणि लेखन क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अत्यंत सर्जनशील ठरेल. तुमची सामाजिक प्रतिमा उंचावेल आणि तुमच्या कामाचे कौतुक सर्वस्तरांतून केले जाईल. कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांतून मोठा आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जुन्या आर्थिक समस्या दूर होऊन जीवनात स्थैर्य येईल. बुधाची ही बदललेली चाल या तीन राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Capital Gains Tax Removed: विदेशी गुंतवणूकदारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; सरकारी बॉन्ड्सवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द, अर्थव्यवस्थेला मिळणार बळ

दूषित अन्नामुळे दरवर्षी 86 कोटी लोक आजारी, 15 लाखांहून अधिक मृत्यू, लहान मुलांना 3 पट धोका; WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट

Vaidhriti Yog 2026: कुटुंबाची साथ सुटणार अन् बजेट कोलमडणार! जून महिन्यात 'डबल वैधृती योग'चा महाधोका; 5 राशींवर ओढवणार संकटांची मालिका

आयपीएल सट्टेबाजी ते दाऊदची धमकी... ललित मोदींच्या मुलाखतीने क्रिकेट जगतात खळबळ, केले अनेक मोठे खुलासे Watch Video

SAFF Championship: भारतीय महिला सहाव्यांदा अंतिम फेरीत, भूतानवर 1-0 फरकाने विजय; विजेतेपदासाठी गतविजेत्या बांगलादेशचे आव्हान

SCROLL FOR NEXT