Mangal Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Mangal Gochar 2026: नोकरीत प्रमोशन अन् धनलाभाचे सुवर्ण योग! मृगशिरा नक्षत्रात मंगळाचे बली गोचर! ''या' राशींचे नशीब चमकणार

Mangal Nakshatra Gochar Horoscope Benefits: द्रिक पंचांगानुसार, आज (24 जुलै) पहाटे 3:29 वाजता ग्रहांचे सेनापती मानल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाने महत्त्वपूर्ण नक्षत्र परिवर्तन केले.

Manish Jadhav

Mangal Nakshatra Gochar Horoscope Benefits: द्रिक पंचांगानुसार, आज (24 जुलै) पहाटे 3:29 वाजता ग्रहांचे सेनापती मानल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाने महत्त्वपूर्ण नक्षत्र परिवर्तन केले. मंगळ ग्रहाने रोहिणी नक्षत्रातून बाहेर पडत मृगशिरा नक्षत्रात प्रवेश केला. ज्योतिषशास्त्रात मृगशिरा नक्षत्रातील मंगळाचे हे भ्रमण अत्यंत विशेष आणि फलदायी मानले जाते, कारण मृगशिरा नक्षत्राचा स्वामी स्वयं मंगळ आहे. आपल्या स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे मंगळ ग्रह अधिक बली म्हणजेच शक्तिशाली आणि प्रभावशाली बनला आहे.

ज्योतिषाचार्य हर्षवर्द्धन शांडिल्य यांच्या मते, या नक्षत्र परिवर्तनामुळे व्यक्तीमधील कामाचा उत्साह, आत्मविश्वास आणि तडफदार निर्णय घेण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

मंगळाचे हे नक्षत्र गोचर नोकरीत प्रमोशन, व्यवसायात वाढ आणि प्रगतीच्या नवीन संधी घेऊन येत आहे. जमीन, घर, मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल. अडकलेले पैसे (Money) परत मिळणे, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणे आणि बँक बॅलन्स मजबूत होण्याचे उत्तम योग बनत आहेत. नवीन व्यवसाय सुरु करणे, मोठी गुंतवणूक करणे किंवा करिअरशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जात आहे. या गोचरचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असला, तरी काही विशिष्ट राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा ठरेल.

मेष राशीचा स्वामी स्वयं मंगळ असल्याने या जातकांसाठी हा बदल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळून वरिष्ठांचा विश्वास वाढेल. तसेच व्यवसायात नवीन क्लायंट मिळणे, मालमत्ता खरेदीच्या योजना पुढे जाणे आणि बँक बॅलन्स वाढणे असे सकारात्मक बदल घडतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

दुसरीकडे, मकर राशीच्या जातकांसाठी हे गोचर केलेल्या कष्टांचे उत्तम फळ देणारे ठरेल. करिअरमध्ये नवी ओळख निर्माण होईल आणि कार्यक्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना मोठा कॉन्ट्रैक्ट मिळून आर्थिक स्थिती भक्कम होईल. घर किंवा वाहनाची खरेदी होण्याची शक्यता असून समाजात मान-सन्मान वाढेल. योग्य वेळेत घेतलेले निर्णय या राशींच्या लोकांसाठी भविष्यातील मोठ्या यशाची मजबूत पायाभरणी करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT