Mahalaxmi Rajyog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Mahalaxmi Rajyog 2026: नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच 'महालक्ष्मी राजयोग'! 'या' चार राशींवर होणार धनाचा वर्षाव; आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Mahalakshmi Rajyog Mars Moon Conjunction: वैदिक ज्योतिषात ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या युतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सध्या कर्क राशीमध्ये मंगळ ग्रह आधीपासूनच विराजमान आहे.

Manish Jadhav

Mahalakshmi Rajyog Mars Moon Conjunction: वैदिक ज्योतिषात ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या युतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सध्या कर्क राशीमध्ये मंगळ ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. अशातच आता चंद्राने देखील कर्क राशीत प्रवेश केल्याने मंगळ आणि चंद्र या दोन महत्त्वपूर्ण ग्रहांची युती निर्माण झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि चंद्राच्या या एकत्र येण्याने अत्यंत शुभ मानला जाणारा 'महालक्ष्मी राजयोग' तयार होत आहे. हा महालक्ष्मी राजयोग मुख्यत्वे मेष, कर्क, तूळ आणि कुंभ या चार राशींच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे.

3 नोव्हेंबरपर्यंत चंद्र सिंह राशीत गोचर करेपर्यंत हा राजयोग प्रभावी राहील. या काळात संबंधित राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये (Career) मोठे यश आणि आर्थिक उन्नतीचे उत्तम योग मिळतील. या राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी यशाचे नवे मार्ग खुले होतील. जर तुम्ही एखाद्या नवीन योजनेवर काम करत असाल तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. व्यावसायिक आणि नोकरीत प्रगतीचे योग असून आर्थिक लाभाचे संकेत आहेत; मात्र घाईगडबडीत कोणतीही गुंतवणूक करणे टाळावे.

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. जीवनात प्रगती संधी मिळतील आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. नोकरीपेशा वर्गासाठी हा काळ सुवर्णमयी असून त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ त्यांना नक्कीच मिळेल.

तसेच, तूळ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग प्रचंड नशीबवान ठरेल. त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल आणि नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ झाल्याने मन प्रसन्न राहील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील महालक्ष्मी राजयोग खूप शुभ परिणाम देईल. या काळात त्यांची आर्थिक प्रगती होईल आणि बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. एकूणच या राजयोगाच्या प्रभावाने या चारही राशींना प्रचंड धनलाभ, सुख-समृद्धी आणि प्रगती प्राप्त होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

France Riots: अराजकाच्या आगीतले फ्रेंच-फ्राईज! फ्रान्समधील हिंसाचार, सामाजिक अस्वस्थता आणि नेतृत्वाच्या संकटाचा वेध

Goa Ring Road Plan: गोव्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'रिंग रोड'चा विचार! CM सावंत यांचे मोठे संकेत

Goa Politics: 'वाद नको, गोवा रक्षणाचा विचार करा'; तृप्ती बकाल यांचा मनोज परब, अजय खोलकरांना टोला

ST Reservation: राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित, गौरव दिनासाठी 8 कोटींचे अंदाजपत्रक; उटा संघटनेचा खर्चाला विरोध

BJP Election Strategy: गोव्यात भाजपचे 'मिशन चौथ्यांदा सत्ता'! 32 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निवडणुकीत करणार प्रचार

SCROLL FOR NEXT