Horoscope 2026: Dainik Gomantak
Horoscope

Horoscope 2026: घर घेण्याचं स्वप्न साकार होणार, जमीन व्यवहारातून मिळणार अफाट पैसा; 'या' राशीवर शनिदेवाची विशेष कृपा

Libra Property Horoscope 2026: ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष तूळ राशीच्या जातकांसाठी स्थावर मालमत्ता, घर आणि जमिनीच्या व्यवहारांच्या दृष्टीने अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे.

Manish Jadhav

Libra Property Horoscope 2026: ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे वर्ष तूळ राशीच्या जातकांसाठी स्थावर मालमत्ता, घर आणि जमिनीच्या व्यवहारांच्या दृष्टीने अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. जर तुम्ही अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहत असाल, तर या वर्षी ते सत्यात उतरण्याचे प्रबळ योग आहेत. ग्रहमानाची स्थिती पाहता, तुमच्या राशीच्या चौथ्या भावाचा स्वामी 2026 मध्ये सहाव्या भावात विराजमान असेल, ज्यामुळे मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल.

विशेषतः जे जातक बऱ्याच काळापासून जमिनीच्या वादात अडकले आहेत, त्यांना या वर्षी शनिदेवाच्या कृपेने दिलासा मिळणार आहे. जुन्या कायदेशीर कचाट्यातून तुमची सुटका होईल आणि वादाचा अंत होऊन निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे.

मालमत्ता खरेदीसाठी हे वर्ष केवळ शुभच नाही, तर आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही ठरेल. या वर्षी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसणारी आणि मनासारखी मालमत्ता मिळण्याचे योग आहेत. जर तुम्हाला घर खरेदीसाठी कर्जाची आवश्यकता असेल, तर बँकांकडून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी होईल आणि कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय तुमचे काम पूर्ण होईल. गुंतवणूक (Investment) म्हणून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तुला राशीच्या लोकांसाठी हे वर्ष मोठे आर्थिक लाभ घेऊन येईल. भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक या वर्षी तुमच्यासाठी उत्पन्नाचा एक उत्तम स्त्रोत ठरु शकते.

मात्र, या शुभ काळात काही खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे. ग्रहमान अनुकूल असले तरी, तूळ राशीच्या जातकांनी कोणत्याही वादात असलेल्या जमिनी किंवा मालमत्तेपासून दूर राहावे. कुणाच्याही संपत्तीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणे किंवा घाईघाईत कागदपत्रांची पडताळणी न करता व्यवहार करणे तुम्हाला महागात पडू शकते. कायदेशीर बाबींमध्ये स्पष्टता असलेल्या जमिनीच खरेदी कराव्यात, जेणेकरुन भविष्यात कोणताही त्रास होणार नाही. एकंदरीत पाहता, स्वतःचे घर बांधण्यासाठी किंवा मोठी मालमत्ता उभी करण्यासाठी 2026 हे वर्ष तूळ राशीसाठी मैलाचा दगड ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT