Horoscope April 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

Leo Horoscope April 2026 Prediction : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती मानवी जीवनावर परिणाम करत असते. जेव्हा एखादा ग्रह प्रतिकूल राशीत किंवा अशुभ स्थितीत असतो.

Manish Jadhav

Leo Horoscope April 2026 Prediction: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती मानवी जीवनावर परिणाम करत असते. जेव्हा एखादा ग्रह प्रतिकूल राशीत किंवा अशुभ स्थितीत असतो, तेव्हा संबंधित राशीच्या व्यक्तींना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रश्न कुंडली तज्ज्ञ पंडित सुरेश पांडेय यांच्या मते, सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल हा महिना ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे कठीण जाण्याची शक्यता आहे. या महिन्यात ग्रहांची जी मांडणी होत आहे, ती पाहता सिंह राशीच्या जातकांना वैयक्तिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्तरांवर सावध राहण्याची गरज आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच शनीची स्थिती सिंह राशीसाठी चिंताजनक ठरणार आहे. 22 एप्रिलपर्यंत शनी 'अस्त' आणि कमकुवत अवस्थेत राहणार असून त्याचा थेट अशुभ प्रभाव सिंह राशीवर पडताना दिसेल. शनीच्या या कमकुवत स्थितीमुळे कामात अडथळे येणे, मानसिक अस्वस्थता जाणवणे किंवा विनाकारण धावपळ होणे असे प्रकार घडू शकतात. शनीची ही प्रतिकूलता 22 एप्रिलपर्यंत अधिक प्रकर्षाने जाणवेल, त्यामुळे या काळात कोणत्याही मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना किंवा नवीन गुंतवणूक (Investment) करताना विचारपूर्वक पाऊल उचलणे हिताचे ठरेल.

केवळ शनीच नाही, तर राहु आणि केतूचे सातव्या भावातील वास्तव्य सिंह राशीच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करताना दिसत आहे. ज्योतिषशास्त्रात सातवे भाव हे भागीदारी आणि वैवाहिक सुखाचे मानले जाते. या भावात राहु-केतूचा प्रभाव असल्यामुळे पती-पत्नीमध्ये विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात. छोटीशी गोष्ट वादाचे मोठे रुप घेऊ शकते, ज्यामुळे घरातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे. अशा वेळी जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवणे आणि एकमेकांच्या मताचा आदर करणे अत्यंत गरजेचे आहे. अहंकारापोटी होणारे वाद टाळल्यास वैवाहिक नात्यातील कटुता कमी होऊ शकेल.

आरोग्याच्या दृष्टीनेही एप्रिल महिना सिंह राशीसाठी 'कमकुवत' मानला जात आहे. या काळात शारीरिक व्याधी डोकं वर काढू शकतात. विशेषतः पोटाशी संबंधित तक्रारी, अपचन किंवा गॅसेसच्या त्रासामुळे तुम्ही हैराण होऊ शकता. खानपानावर नियंत्रण ठेवणे आणि बाहेरील अन्न टाळणे हाच यावर उत्तम उपाय ठरेल. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, या महिन्यात दुखापत किंवा अपघाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाहन चालवताना किंवा रस्त्यावरुन चालताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. ग्रहांची ही अशुभ स्थिती पाहता, सिंह राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात घाईघाईत कोणतेही काम करु नये आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, असा सल्ला ज्योतिषतज्ज्ञांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

Goa Eco-Friendly Ganesha: मूर्तीकारांसाठी सावंत सरकारची मोठी घोषणा! आता प्रत्येक मातीच्या मूर्तीवर मिळणार 'इतके' अनुदान; पर्यावरण संरक्षणाचा नवा पॅटर्न

Goa Shack Policy 2026: गोव्यात सुधारित 'शॅक धोरण' लागू! समुद्रकिनाऱ्यावर डेक-बेड्स, छत्र्या ठेवण्यासाठी पर्यटन खात्याने मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT