Lakshmi Narayan Rajyog May 2026 Dainik Gomantak
Horoscope

Lakshmi Narayan Rajyog: "बुध-शुक्राची जुळली युती, लक्ष्मी नारायण योगाची प्राप्ती!" परदेश प्रवासासोबत अचानक धनलाभाचे संकेत

Lakshmi Narayan Rajyog May 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची युती ही अत्यंत फलदायी मानली जाते आणि जेव्हा बुद्धीचा कारक 'बुध' आणि वैभवाचा कारक 'शुक्र' एकत्र येतात.

Manish Jadhav

Lakshmi Narayan Rajyog May 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची युती ही अत्यंत फलदायी मानली जाते आणि जेव्हा बुद्धीचा कारक 'बुध' आणि वैभवाचा कारक 'शुक्र' एकत्र येतात, तेव्हा 'लक्ष्मी नारायण राजयोग' निर्माण होतो. मे च्या अखेरीस मिथुन राशीत हा अत्यंत शुभ राजयोग जुळून येत असून त्याचा सकारात्मक प्रभाव अनेक राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे.

द्रिक पंचांगानुसार, शुक्र ग्रह 14 मे पासून 8 जूनपर्यंत मिथुन राशीत विराजमान असेल. दरम्यान, 29 मे 2026 रोजी बुध ग्रह देखील मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 22 जून 2026 पर्यंत तिथेच राहील. या दोन्ही ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे 29 मे रोजी लक्ष्मी नारायण राजयोग तयार होईल, ज्याचा प्रभाव 8 जूनपर्यंत राशींवर प्रकर्षाने जाणवेल. या काळात मेष, मिथुन, तूळ आणि कुंभ या राशींचे नशीब पालटणार असून त्यांना विविध क्षेत्रात यश मिळण्याचे संकेत आहेत.

मेष राशीच्या जातकांसाठी हा राजयोग मानसिक शांतता देणारा ठरेल. जर तुम्ही एखाद्या विषयामुळे मनातल्या मनात काळजीत असाल, तर त्या समस्येचे समाधान या काळात नक्कीच मिळेल. नवीन काम सुरु करण्याची योजना आखत असाल, तर त्यात तुम्हाला यश मिळेल. विशेष म्हणजे, तुमच्या पाठीमागे कारस्थान करणाऱ्या गुप्त शत्रूंचे चेहरे तुमच्यासमोर येतील, ज्यामुळे तुम्ही सावध होऊ शकाल.

मिथुन राशीतच हा योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. विश्वासू व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून सुखरुप बाहेर पडाल. एखाद्या खास व्यक्तीसोबत परदेश प्रवासाची संधी मिळेल आणि तुमच्या पूर्वपुण्याईचे फळ आता तुम्हाला प्राप्त होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढून एक नवी ओळख निर्माण होईल.

तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक आघाडीवर हा योग सुखद बदल घडवणारा आहे. अनेक वर्षांपूर्वी केलेली गुंतवणूक आता तुम्हाला मोठा नफा मिळवून देईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा बरीच सुधारलेली असेल. तसेच, मे महिन्याचा शेवट आणि जून 2026 च्या सुरुवातीला तुमच्या आरोग्यात (Health) मोठी सुधारणा झाल्याचे तुम्हाला जाणवेल. कुंभ राशीच्या जातकांना या काळात कौटुंबिक सुख मिळेल. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहाल. जोखमीच्या कामांमध्ये या काळात नुकसान होणार नाही आणि तुमचा आत्मविश्वास सामान्य पातळीवर टिकून राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT