Gajlakshm Rajyog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

Gajalakshmi Rajyoga June 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांची युती मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर प्रभाव पाडत असते.

Manish Jadhav

Gajalakshmi Rajyoga June 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांची युती मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर प्रभाव पाडत असते. यामध्येच ग्रहांचे गुरु असणारे 'गुरु' आणि दैत्यांचे गुरु असणारे 'शुक्र' या दोन अत्यंत शुभ ग्रहांची युती ज्योतिषशास्त्रात महाभाग्यशाली मानली जाते. जून महिन्याच्या सुरुवातीलाच असा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग घडून येत आहे. 2 जून 2026 रोजी मंगळवारी पहाटे 2 वाजून 25 मिनिटांनी गुरु ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

यानंतर, अवघ्या काही दिवसांतच म्हणजेच 8 जून 2026 रोजी सोमवारी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी शुक्र ग्रह देखील कर्क राशीत गोचर करेल. 8 जून रोजी कर्क राशीत या दोन्ही बलाढ्य ग्रहांची युती झाल्यामुळे 'गजलक्ष्मी राजयोग' निर्माण होणार आहे. या अत्यंत शुभ राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसेल, परंतु 4 भाग्यवान राशींसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार असून त्यांना अफाट धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत.

या राजयोगाचा सर्वाधिक फायदा वृषभ राशीच्या जातकांना होणार आहे. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र ग्रह असून, तो गुरुसोबत मिळून गजलक्ष्मी योगाची निर्मिती करत आहे. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळेल आणि मोठी यशोगाथा लिहिता येईल. समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा कमालीची वाढेल.

कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांच्याच राशीच्या प्रथम म्हणजेच लग्न भावात तयार होत आहे. स्वतःच्या राशीत हा राजयोग बनणे अत्यंत भाग्यशाली मानले जाते. याच्या प्रभावाने तुमचा मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. समाजात मानसन्मान वाढण्यासोबतच करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.

कन्या राशीच्या लोकांसाठी हा शुभ गजलक्ष्मी राजयोग त्यांच्या कुंडलीच्या अकराव्या भावात म्हणजेच लाभ स्थानात निर्माण होत आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू कमालीची मजबूत होईल. बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात तुम्हाला अनपेक्षितपणे परत मिळतील. जे लोक व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत, त्यांना एखादी मोठी डील मिळाल्यामुळे बंपर नफा कमावता येईल. हा काळ गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम असून, आता केलेली गुंतवणूक (Investment) भविष्यात मोठा परतावा देईल.

शेवटी, मीन राशीच्या जातकांसाठी देखील हा योग अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. मीन राशीच्या पाचव्या भावात ही युती होत असल्याने, शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मोठे यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल. तुम्हाला अचानक कुठूनतरी मोठा धनलाभ होऊ शकतो. विवाहित लोकांसाठी हा काळ आनंदाचा असेल, कारण त्यांना आपल्या मुला कडून एखादी अत्यंत चांगली बातमी किंवा सुखद धक्का मिळण्याची दाट शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'काकांनी खूप त्रास दिला, पोटात दुखतंय'; स्कूल व्हॅनमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, चालकाला अटक

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी 3 राशींवर श्रीकृष्णाची विशेष कृपा; रखडलेली कामं मार्गी लागणार, सिंह-धनूसाठी सावधगिरीचा दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातून 'सेटलमेंट'चा डाव? तारक आरोलकरांच्या कथित ऑडिओने खळबळ; न्यायालयात पेनड्राईव्ह सादर

ENG vs PAK: इंग्लंड दौऱ्यात पाकड्यांची नाचक्की! खेळाडूचा 'किंग चार्ल्स'ला भेटण्यास नकार; सर्फराज अहमदची हकालपट्टी

Viral Post: ना ऑफिसची कटकट, ना ट्रॅफिकचं टेन्शन! हिमाचल सोडून थेट गोव्याचा समुद्र गाठला; 'Work From Home' करणाऱ्या तरुणाची अनोखी कहाणी VIDEO

SCROLL FOR NEXT