Horoscope Today May 24, 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: सूर्यदेवाच्या कृपेने रविवार ठरणार खास, नोकरीत प्रमोशन आणि हातात पैसाच पैसा! 'या' 4 भाग्यवान राशींचे नशीब पालटणार

Horoscope Today May 24, 2026: आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असून रविवारचा एक उत्तम योग जुळून आला आहे.

Sameer Amunekar

आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असून रविवारचा एक उत्तम योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, आज संपूर्ण दिवस आणि रात्र ओलांडून पहाटे ४:३१ वाजेपर्यंत नवमी तिथी राहील. यासोबतच, आज मध्यरात्री ३:४५ पर्यंत 'हर्षण योग' असणार आहे, तर उत्तररात्री २:५१ पर्यंत पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रभाव दाखवेल. या विशिष्ट ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे आजचा दिवस काही खास राशींसाठी अत्यंत भाग्यवान आणि आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरेल.

मिथुन आणि कन्या राशीसाठी सुवर्णकाळ

आजचा रविवार मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना बऱ्याच दिवसांपासून रखडलेले धन लाभ मिळण्याचे संकेत आहेत. तसेच, आज संध्याकाळपर्यंत एखादी मोठी गूड न्यूज तुमच्या पदरात पडू शकते. दुसरीकडे, कन्या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सुवर्णसंधींचा असेल. व्यापारी वर्गाला व्यवसायात मोठी प्रगती पाहायला मिळेल आणि कौटुंबिक जीवनात कमालीचा गोडवा राहील. नोकरी करणाऱ्यांना आवडीचे काम मिळाल्याने उत्साह द्विगुणित होईल.

वृश्चिक आणि धनू राशीला मिळणार मेहनतीचे फळ

आज वृश्चिक आणि धनू राशीच्या लोकांवर नशिबाची विशेष कृपा असेल. वृश्चिक राशीच्या व्यक्ती आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर अपेक्षेपेक्षा जास्त नफा कमावण्यात यशस्वी होतील. घरात नवीन पाहुण्याचे आगमन होण्याचे शुभ संकेत असून आनंदाचे वातावरण राहील. तर धनू राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कार्यक्षेत्र आणि घर यामध्ये योग्य ताळमेळ राखणारा ठरेल. रिअल इस्टेट क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा काळ अत्यंत उत्तम आहे.

इतर राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

मेष आणि वृषभ राशीच्या लोकांना आज मित्रांचे आणि कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. रखडलेली कामे प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने पूर्ण होतील. कर्क आणि सिंह राशीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांचे जुने कौटुंबिक मतभेद आज संपुष्टात येतील. तूळ आणि मकर राशीच्या जातकांसाठी आर्थिक बाजू मजबूत राहील आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या डोकेदुखी किंवा तणावापासून मुक्ती मिळेल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना आरोग्यामध्ये सुधारणा जाणवेल, मात्र यश मिळवण्यासाठी आज वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT