Horoscope Today June 13, 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: अधिक मासातील शिवरात्री ठरणार खास! 'या' 5 राशींवर असणार महादेवाची विशेष कृपा, धनलाभाचे योग

Horoscope Today June 13, 2026: आज १३ जून २०२६, शनिवार हा दिवस अतिशय खास आहे. आज अधिक ज्येष्ठ कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी असून, याच दिवशी 'मास शिवरात्री'चा पवित्र सण साजरा केला जात आहे.

Sameer Amunekar

आज १३ जून २०२६, शनिवार हा दिवस अतिशय खास आहे. आज अधिक ज्येष्ठ कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी असून, याच दिवशी 'मास शिवरात्री'चा पवित्र सण साजरा केला जात आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आज सुकर्मा योग आणि कृत्तिका नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे, ज्यामुळे हा दिवस अनेकांसाठी उत्साहाची आणि आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आजच्या दिवशी भगवान शंकराची उपासना करणे विशेष फलदायी मानले जाते. आचार्य इंदू प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली जाणून घेऊया आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.

मेष आणि वृषभ: प्रगतीचे नवे मार्ग मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रचंड उत्साहाचा असणार आहे. अडकलेले जुने पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. दुसरीकडे, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस अतिशय अनुकूल आहे. जे व्यापारी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडत आहेत, त्यांना मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे लोक प्रभावित होतील.

मिथुन ते सिंह: यशाची सोनेरी पहाट मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा काळ उत्तम आहे. कुटुंबासोबत नवीन घर घेण्याबाबत चर्चा होऊ शकते. कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस शानदार असून जोडीदाराची साथ मिळाल्याने कामात यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक आणि मानसिक शांतता लाभेल. आज नोकरी शोधणाऱ्यांना एखाद्या व्यक्तीच्या मदतीने मोठी संधी चालून येऊ शकते.

कन्या ते धनु: संतुलित दिनचर्या कन्या राशीच्या व्यक्तींना आज कामाचा व्याप जास्त राहील, मात्र कुटुंबासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. तुळा राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा आहे, तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यापारात केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांनी आज आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस सामान्यपणे आनंदात जाईल.

मकर ते मीन: सकारात्मकतेचा संचार मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला इतरांकडून प्रोत्साहन मिळेल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Leopard Attack: हरमलमध्ये बिबट्याची दहशत! घराच्या पहिल्या मजल्यावर चढून कुत्र्याचा घेतला बळी; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर वन खाते सक्रिय

Shukra Gochar 2026: "भावा, आता पैसाच पैसा!" बॉस देणार पगारवाढ आणि प्रमोशन; शुक्र देवाच्या कृपेनं 5 राशी होणार मालामाल

Sugar Price Hike: साखरेच्या वाढत्या दरांना लगाम! केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये, आयात केलेल्या साखरेसाठी नवा नियम

Rahul Gandhi Women Statement: 'स्त्री ही कोणाचीही मालकी नाही'; राहुल गांधींच्या विधानापलीकडचा पुरुषसत्ताक व्यवस्थेवरील गंभीर सवाल

VIDEO: पिकनिकसाठी गेले अन् पुराच्या पाण्यात अडकले! 15 तास मृत्यूशी झुंज, तिघांचा थरारक रेस्क्यू; व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT