Shukra Gochar 2026: "भावा, आता पैसाच पैसा!" बॉस देणार पगारवाढ आणि प्रमोशन; शुक्र देवाच्या कृपेनं 5 राशी होणार मालामाल

Venus Transit Chitra Nakshatra Financial Benefits: ज्योतिषशास्त्रामध्ये धन, वैभव, ऐश्वर्य आणि सुख-सुविधांचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह आज आपले नक्षत्र परिवर्तन करत आहे.
Venus Transit Chitra Nakshatra Financial Benefits
Shukra Gochar Dainik Gomatak
Published on
Updated on

Venus Transit Chitra Nakshatra Financial Benefits: ज्योतिषशास्त्रामध्ये धन, वैभव, ऐश्वर्य आणि सुख-सुविधांचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्र देवाने आज (25 ऑगस्ट) 12 वाजून 41 मिनिटांनी हस्त नक्षत्रातून निघून मंगळाचे अधिपत्य असलेल्या 'चित्रा' नक्षत्रात प्रवेश केला. शुक्राचा मंगळाच्या नक्षत्रातील हा प्रवेश सर्व 12 राशींवर प्रभाव टाकणारा ठरेल. मात्र, ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, 5 विशिष्ट राशींसाठी हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ आणि समृद्धी आणणारा ठरणार आहे.

शुक्र देव येत्या 11 सप्टेंबरपर्यंत चित्रा नक्षत्रात राहतील आणि त्यानंतर स्वाती नक्षत्रात गोचर करतील. या कालावधीत संबंधित राशींच्या जातकांच्या धाडसात वाढ होईल आणि धन-धान्याचे नवीन स्रोत निर्माण होतील.

Venus Transit Chitra Nakshatra Financial Benefits
Horoscope: भौम प्रदोषचा शुभ प्रभाव! मंगळवारी 'या' राशीची चांदी! नोकरी-व्यवसायात मोठा लाभ, रखडलेली कामंही होणार पूर्ण

वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र ग्रह असल्याने हे नक्षत्र परिवर्तन या राशीसाठी विशेष लाभदायक ठरेल. गेल्या काही काळापासून रडखडलेली कामे आता मार्गी लागतील आणि कारकिर्दीत यशाचे नवीन मार्ग सुकर होतील. वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होऊन कौटुंबिक सुखात वाढ होईल. दुसरीकडे, मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक प्रगतीचा ठरणार आहे. नोकरीत बदल करु इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी चालून येतील, तर व्यापाऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळाल्याने बँक बॅलन्स वाढेल. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील आणि भौतिक सुख-सुविधांवर खर्च होण्याची शक्यता आहे.

Venus Transit Chitra Nakshatra Financial Benefits
Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर सिद्ध होईल. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. व्यवसायात मोठी डील फायनल झाल्यामुळे मोठा नफा हाती येईल. तुळ राशीच्या जातकांबाबत बोलायचे झाल्यास, चित्रा नक्षत्रातील प्रवेशामुळे समाजात मान-सन्मान वाढेल आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. मात्र, कोणताही आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय, मकर राशीच्या जातकांसाठी नोकरीत पदोन्नती (Promotion) आणि वेतनवाढीचे स्पष्ट योग दिसत आहेत. व्यापाऱ्यांना देखील या गोचर कालावधीत अनपेक्षित नफा मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com