Horoscope Today August 22, 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: बुधाच्या राशीपरिवर्तनाने 'या' राशींचं नशीब चमकणार! आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा, नोकरीच्या नव्या संधींसह प्रगतीचे योग

Horoscope Today August 22, 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीतील बदलांचा परिणाम मानवी जीवनातील विविध क्षेत्रांवर होत असल्याचे मानले जाते.

Sameer Amunekar

आज श्रावण शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून ज्येष्ठा नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. यासोबत रवियोगही असल्याने दिवसाचे महत्त्व वाढत असल्याचे ज्योतिषीय मत आहे. बुध हा बुद्धी, संवाद, व्यापार, शिक्षण आणि तर्कशक्तीशी संबंधित ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या राशीपरिवर्तनामुळे या क्षेत्रांमध्ये विशेष बदल जाणवू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

मेष राशीला व्यवसायात मिळू शकतो फायदा

मेष राशीच्या जातकांसाठी दिवस उत्साहवर्धक ठरण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही सकारात्मक बदल घडू शकतात आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारू शकते. कुटुंबातील मतभेद दूर होऊन वातावरण आनंदी होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीनेही दिवस महत्त्वाचा असून नोकरीसाठी अर्ज करणे किंवा मुलाखतीला जाण्यासाठी वेळ अनुकूल असल्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांनाही विशेषतः नर्सिंग किंवा संबंधित अभ्यासक्रमात चांगल्या संधी मिळू शकतात.

शुभ रंग – गोल्डन | शुभ अंक – 2

वृषभ राशीसाठी प्रगतीची संधी

वृषभ राशीच्या व्यक्तींना व्यवसाय विस्तारासाठी नवीन मार्ग मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता असून ज्येष्ठ व्यक्तींकडून कौतुक मिळू शकते. यापूर्वी केलेल्या मदतीचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत कायम ठेवावी. अध्यात्मिक कार्याकडेही मन वळू शकते.

शुभ रंग – लाल | शुभ अंक – 5

मिथुन राशीला मिळू शकते मोठी डील

मिथुन राशीसाठी आजचा दिवस आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. घर खरेदीचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी किंवा प्रकल्प मिळू शकतो, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. व्यवसायात विशेषतः कापड क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होण्याचे संकेत आहेत.

शुभ रंग – हिरवा | शुभ अंक – 4

कर्क राशीची नोकरीची प्रतीक्षा संपणार?

कर्क राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत मिळेल. सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्पाची संधी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल.

शुभ रंग – जांभळा | शुभ अंक – 7

सिंह राशीला आर्थिक लाभाचे संकेत

सिंह राशीच्या जातकांसाठी दिवस संमिश्र असला तरी आर्थिक बाबतीत चांगला ठरू शकतो. ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. मेहनतीमुळे तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, तर व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

शुभ रंग – मॅजेंटा | शुभ अंक – 5

कन्या राशीला रोजगाराच्या नव्या संधी

कन्या राशीसाठी आजचा दिवस नव्या संधी घेऊन येऊ शकतो. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि निर्णयक्षमतेचा उपयोग करून एखादे महत्त्वाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करू शकता. रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. घरात शुभ कार्यक्रम होण्यामुळे आनंदाचे वातावरण राहू शकते.

शुभ रंग – पिवळा | शुभ अंक – 2

तुळ राशीला मोठ्या कंपनीकडून ऑफर?

तुला राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर येऊ शकते. व्यवसायात मेहनत वाढवावी लागेल, मात्र जीवनसाथीची मदत काम सोपे करू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहारातूनही आर्थिक फायदा होण्याचे संकेत आहेत.

शुभ रंग – हिरवा | शुभ अंक – 1

वृश्चिक राशीच्या व्यवसायात वाढ

वृश्चिक राशीच्या जातकांना व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. मित्रांसोबत सहलीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक नात्यातील गैरसमज दूर होऊन घरातील वातावरण आनंदी राहू शकते.

शुभ रंग – नारंगी | शुभ अंक – 7

धनु राशीला पगारवाढीची शक्यता

धनु राशीसाठी दिवस काहीसा संमिश्र राहू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पगारवाढीची शक्यता असल्याने आर्थिक बाबतीत समाधान मिळू शकते. मात्र कौटुंबिक समस्यांचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजी घ्यावी. शांतपणे आणि सातत्याने प्रयत्न केल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येईल.

शुभ रंग – सिल्व्हर | शुभ अंक – 9

मकर राशीच्या नव्या योजना यशस्वी होणार?

मकर राशीचे जातक व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना आखू शकतात. योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे त्याचा फायदा भविष्यात मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राची भेट झाल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कुटुंबात शांतता राहील. लेखन किंवा सर्जनशील कामाकडेही मन वळू शकते.

शुभ रंग – निळा | शुभ अंक – 8

कुंभ राशीसाठी नवीन सुरुवातीचा दिवस

कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला ठरू शकतो. आळस बाजूला ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क वाढू शकतो. महत्त्वाच्या बैठकीत तुमचे विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळेल.

शुभ रंग – गुलाबी | शुभ अंक – 3

मीन राशीला कुटुंबाकडून आनंदाची बातमी

मीन राशीच्या जातकांसाठी दिवस अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळू शकते. कामावर लक्ष केंद्रित केल्यास एखादा महत्त्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल. ऑफिसमधील मित्रांसोबत बाहेर जाण्याचे नियोजन होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करण्याची संधी मिळणे शुभ मानले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT